Prashant Kishor Recommends Change in State Leadership After Meeting Sunetra Pawar Saam TV marathi
महाराष्ट्र

Sunetra Pawar : सुनील तटकरेंचं प्रदेशाध्यक्षपद जाणार? बड्या नेत्याचा सुनेत्रा पवारांना सल्ला, राष्ट्रवादीत खळबळ

Sunetra Pawar, Sunil Tatkare, Prashant Kishor : विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य नेतृत्वात बदल करण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपद, पक्षबांधणी आणि संघटनात्मक बदलांबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे

Namdeo Kumbhar

Prashant Kishor Recommends Change in State Leadership After Meeting Sunetra Pawar : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विश्वासनीय सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत पक्षाच्या राज्य नेतृत्वाबाबत चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदात बदल करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रशांत किशोर यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाल्याची माहिती समजतेय. या चर्चेवेळी प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना पक्षात काही महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजतेय. याशिवाय पक्षबांधणी, संघटनात्मक रचना आणि आगामी राजकीय रणनीतीतही मोठे बदल सुचविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर बदल होणार का? याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्य नेतृत्वामध्ये बदलाची शिफारस करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेऊन महत्त्वाची चर्चा केली. या बैठकीत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलावा असा सल्ला दिला असून, पक्षबांधणी व संघटनेतही मोठे बदल सुचवले आहेत.

सल्ला देण्यामागचे मुख्य कारण ?

गेल्या काही दिवसांत पक्षाबाबत होणारी नकारात्मक चर्चा (Negative Publicity) थांबवण्यासाठी आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी संघटनात्मक व नेतृत्व बदल आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. नवीन प्रदेशाध्यक्ष असा असावा, ज्याच्यावर इतर कोणतीही अतिरिक्त जबाबदारी नसेल आणि जो पूर्णवेळ राज्यात पक्षबांधणी व संघटनात्मक कामात सक्रिय राहील, अशी शिफारस करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कडुलिंबाचा सोपा उपाय, चेहऱ्यावरील हट्टी डाग आणि पुरळ झटक्यात होतील गायब

Kunbi Caste Validity Certificate: कुणबी प्रमाणपत्रासाठीचे किती अर्ज वैध अन् अवैध ठरले? जिल्हानिहाय आकडेवारी आली समोर

Maharashtra News Live Update: लोणावळा–देवले मार्गावर दरड; रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगड

लाचखोरीत पोलिस विभाग सर्वात पुढे! एसीबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर, २ कोटींहून अधिकचा व्यवहार उघड...

कॉलेजची फी २० हजार अन् क्लासची १ लाख?" राज ठाकरेंचा संताप; फडणवीस अन् चंद्रकांत पाटलांना दिला 'हा' थेट इशारा

SCROLL FOR NEXT