BJP's Leader on Manoj Jarange Patil Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार; फडणवीसांवरील टीकेला भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर

BJP's Prasad Lad on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय, अशा शब्दात भाजप नेते प्रसाद लाड यांनी फडणवीसांवरील टीकेवरून मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्याकडून सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी देवेंद्र फडणवीसांवरील टीकेला मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी व्हिडिओ शेअर करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. प्रसाद लाड म्हणाले, 'मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन द्वेष करत आहेत. जरांगे पाटील यांना डीडी नावाचा रोग झाला आहे. त्यांना देवेंद्र द्वेष झालाय. जे ६० वर्षात झालं नाही, ते २०१७ साली आरक्षण दिलं. शिक्षण पद्धतीत बदल केला. मुलं परदेशात शिकायला जावी, यासाठी प्रयत्न केला. नोकऱ्या मिळण्यासाठी प्रयत्न केले. असे अनेक उपक्रम केले. मात्र, मनोज जरांगे कोणाच्या छताखालून द्वेष करताय, हा संशोधनाचा विषय आहे.

मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांचा द्वेष करताय, ते योग्य नाही. जरांगे पाटील यांना त्यांच्या आजूबाजूची पिल्लावळ चुकीची माहिती देत आहेत. प्रवीण दरेकर हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. तुम्ही चर्चेला तयार आहात का? तुम्ही चर्चेला याच. २०१७ पासून अनेक योजना काढल्या. मी देखील त्याच समाजातून येतो. पण विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुम्ही राजकारणात यावं. राजकारणाचं उत्तर हे राजकारणाने द्यावं. समाजासाठी लढायचं असेल तर चर्चेतून मार्ग काढावा. चर्चेला तयार आहोत.

मराठा आरक्षणावर राम कदम काय म्हणाले?

मराठा आरक्षणावरून राम कदम यांनी मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं. 'मराठा समाजाची 50 वर्षापासून आरक्षणाची मागणी आहे. या दरम्यान अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. शरद पवार तीनदा मुख्यमंत्री झाले. यांच्यापैकी एकालाही कधी मराठा समाजाची आठवण झाली नाही. पहिल्यांदा आरक्षण देण्याचा आणि मराठा समाजा दिलेला आरक्षण कोर्टात टिकवण्याचं काम जन्माला ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांचा काय अपराध आहे? अपराध जर कोणाचा असेल तर उद्धव ठाकरे यांचा आहे. त्यांच्या कर्तव्य शून्यतेमुळे त्यांना ते कोर्टात टिकवता आलं नाही. आपला जर कोणाचा असेल तर शरद पवारांचं देखील आहे. ते मुख्यमंत्री असून त्यांना मराठा समाज का आठवला नाही? असा सवाल राम कदम यांनी केला.

'अपराध जर कोणाचा असेल तर त्या काँग्रेसमधील दुटप्पी नेत्यांचा आहे. आता नुकताच अधिवेशन झालं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष बैठक बोलावली. मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवाले का आले नाही? ठाकरे गटाचे देखील आले नाही? कोणी अडवलं होतं? शरद पवार गटातील नेत्यांना त्यामुळे या तीनही पक्षाची भूमिका ही आजही समाजामध्ये भांडण लावण्याची आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासाठी देव माणूस म्हणून पूर्णपणे झोकून देऊन काम करत आहेत. मुख्यमंत्री देखील झोकून देऊन काम करत आहे आणि त्याला नाकारता येणार नाही. सरकारची भूमिका आरक्षणाविषयी पूर्णपणे पॉझिटिव्ह आहे. पण या तिघांची भूमिका काय? हा सवाल आपण त्यांना कधी विचारणार आहोत, असेही राम कदम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

SCROLL FOR NEXT