praniti shinde saam tv
महाराष्ट्र

मला सत्तेचे काही घेणं देणं नाही; 'मविआ' च्या निर्णयावर आमदार प्रणिती शिंदे भडकल्या

उजणी धरणाचे पाणी अन्य जिल्ह्यात देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे.

विश्वभूषण लिमये

साेलापूर : सोलापूरचे (solapur) पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर रान पेटवू असा इशारा आमदार प्रणिती शिंदे (praniti shinde) यांनी सरकारला (maharashtra government) दिला आहे. मला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिली आहे असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. उजनी धरणाचे (ujani dam) पाणी इंदापूर आणि बारामतीला देण्याच्या प्रश्नावर आमदार शिंदे यांनी माध्यमांपुढे भुमिका स्पष्ट केली. (praniti shinde latest marathi news)

प्रणिती शिंदे म्हणाल्या उजनीचे पाणी 20 वर्षापुर्वी सुशीलकुमार शिंदे (sushilkumar shinde) यांनी पाईपलाईनद्वारे सोलापूरला आणले. आत्ता उजनी प्लस असूनही महापालिकेतून याचे नियोजन होत नाही. कॉंग्रेस सत्तेत असताना दुष्काळातसुध्दा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत होते. तेव्हा उजनी मायनसमध्ये होते तरीही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला.

पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan) हे मुख्यमंत्री असताना एका रात्रीत दाेन कोटी रुपये खर्च करुन सक्शन पंप लावून एका रात्रीत पाणी आणले. दुष्काळ पडल्यानंतर देखील आम्ही हद्दवाढ भागातही दोन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न केला. आत उजनी प्लसमध्ये असतानासुद्धा पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय मेलो का ?

मला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिली आहे. सोलापूरकरांचे पाणी वळवत असाल तर खबरदार आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. आम्हांला पाणी द्या, रोज पाणी द्या आणि आमच्या पाण्याला हात लावू नका अशी भुमिका आमदार शिंदे यांनी मविआ सरकारच्या निर्णयावर माध्यमांसमाेर मांडली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

SCROLL FOR NEXT