Controversy erupts after stand-up comedian Pranit More and a KEM doctor face backlash over alleged obscene remarks during a live show. Saam tv
महाराष्ट्र

कॉमेडीच्या नावाखाली विकृतीचा कळस, प्रणित मोरे, डॉ. सेजल पवारनं लाज आणली

Pranit More Standup Controversy Sejal Pawar Action: स्टँड-अप कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलतेचा कळस गाठण्याचे प्रकार असल्याचं वारंवार घडतंय. प्रणित मोरेच्या शोमध्ये तर प्रेक्षकांनीही बिभत्सपणा करण्यात आघाडी घेतली. या शोमध्ये महिला डॉक्टरनंही संतापजनक कृत्य केलंय. कोण आहे ही डॉक्टर आणि प्रणितसोबत तिच्यावरही काय कारवाई होणार यावरचा हा रिपोर्ट...

Saam Tv

स्टँड-अप कॉमेडीच्या नावाखाली विकृतीचा कळस गाठला जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. एका तरुणाचा 'बिर्याणीचा किस्सा' आणि मुंबईच्या नामांकित केईएम रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या अश्लील वक्तव्यामुळे स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे आता चांगलाच अडचणीत आलाय. विकृतीलाच विनोद समजणाऱ्या प्रणित मोरेसह हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवारविरोधातही गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे, डॉ. सेजल पवारनं केलेल्या अश्लील वक्तव्याची केईएम रुग्णालयानंही गंभीर दखल घेतली असून तिच्यावर निंलबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे, स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलतेचा बाजार मांडणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनीही सूचक इशारा दिलाय. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये डॉ. सेजल पवारनं आपले केईएममधील अनुभव सांगताना मृतदेहांबाबत अश्लील भाषा वापरली होती आणि मृतदेहांची खिल्लीही उडवली होती. टीकेची झोड उठल्यानंतर डॉ. सेजल पवारनं माफी मागितली आहे.

धावपळीच्या जगात स्ट्रेस बस्टर म्हणून लोक कॉमेडी एन्जॉय करतात. मात्र, विनोदाच्या नावाखाली स्त्रीचा अपमान करणं, मृतदेहांची शाब्दिक विटंबना करणं कितपत योग्य आहे? तेही स्वत:ला उच्चशिक्षित म्हणून मिरवणाऱ्या आणि स्वत:ला कूल जनरेशन म्हणवून घेणाऱ्यांकडून...यांच्यावर कायदेशीर कारवाई तर व्हायलाच हवी आणि ती होईलही. मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली कॉमेडीच्या आडून ही विकृती मानसिकता जाणार कशी हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT