Prakash Ambedkar Saam Tv
महाराष्ट्र

एनआयएची PFI वर छापेमारी; प्रकाश आंबेडकर म्हणतात पुरावे द्या, अन्यथा...

केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या NIA आणि महाराष्ट्र ATS ने देशासह राज्यभरात PFI संघटनांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली.

विश्वभूषण लिमये

Praksha Ambedkar News : केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या NIA आणि महाराष्ट्र ATS ने देशासह राज्यभरात PFI संघटनांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केली. तब्बल ११ राज्यांमध्ये केलेल्या या छापेमारीत १०० जणांना ताब्यात घेण्यात आलं. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली NIA ही कारवाई केली आहे. या कारवाईवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Prakash Ambedkar News Today)

'गुरूवारी सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतु, त्याचबरोबर राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय होतं'? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

'धाडसत्रात आपण जे कागदपत्र गोळा केलेले आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या यंत्रणांनी येत्या २४ तासात लोकांसमोर मांडावं. तपास यंत्रणांना २४ तासात हे मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असे असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते'. असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर निशाणा देखील साधला.

PFI संघटनेविरोधात महाराष्ट्रात कुठे कुठे झाली कारवाई?

PFI ही संघटना दहशतवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे या संस्थेच्या भारतातील विविध कार्यालयांवर NIA आणि ED ने जवळपास १० राज्यांमध्ये छापेमारी करत संस्थेतीन १०० च्यावर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

देशभरात एकूण १०६ जणांना ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून यामध्ये महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश आहे. पीएफआय संदर्भात महाराष्ट्रातील २० ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यामध्ये नवी मुंबई, नाशिक, कोल्हापूर औरंगाबाद यासारख्या शहरांचा समावेश होता.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

VIDEO : आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, राज ठाकरेंच्या 'त्या' विधानावर राऊतांची प्रतिक्रिया | Marathi News

SCROLL FOR NEXT