Shivsena, supreme Court
Shivsena, supreme CourtSaam Tv

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर पडणार; ठाकरे गटाने घेतली 'ही' भूमिका

महाराष्ट्र सत्तासंघर्षाची निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली सुनावणी लांबणीवर पडली आहे.
Published on

मुंबई: महाराष्ट्र सत्तासंघर्षाची निवडणूक आयोगाकडे सुरू असलेली सुनावणी लांबणीवर पडली आहे. ठकरे (Uddhav Thackeray) गटाने अजुनही निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडलेल नाही. २७ सप्टेंबर च्या सुनावणीत ठाकरे गट आपलं म्हणणं मांडणार आहे. २३ सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडण्याची मुदत संपत असताना उद्धव ठाकरे यांच्या गटाने आम्ही आमचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयात मांडू अशी भूमिका घेतली आहे.

२७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सुनावणी होणार असून, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ७ सप्टेंबरची सुनावणीत आम्ही २७ सप्टेंबर ला संपूर्ण प्रकरणाच्या तपशीलवार सुनावणी घेऊन शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत सर्वांचे थोडक्यात युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यात येईल असं सांगितलं होतं.

Shivsena, supreme Court
'अधीश' बंगल्यावर हातोडा पडणार? नारायण राणेंनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव

जोपर्यंत चिन्हाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्य बाण हे चिन्ह गोठवण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोग चिन्हावर निर्णय घेऊ शकते की, नाही हे २७ सप्टेंबरच्या सुनावणीत न्यायालय ठरवणार आहे.

Shivsena, supreme Court
तरुणांच्या रोजगाराची सोय होणार; कोकणात हा मोठा प्रकल्प राबविण्यात येणार

२३ ऑगस्टला ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने आपलं म्हणणं मांडण्यासाठी वेळ मागितला होता. ही मुदत संपत असताना २३ ऑगस्टच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने जोपर्यंत घटनापिठाची पुढील सुनावणी होत नाही. तोपर्यंत निवडणूक आयोगाची कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते. ७ सप्टेंबर पर्यंत देखील कोणताही तोडगा न निघाल्याने २७ सप्टेंबरला ही तारीख देण्यात आली होती. त्यामुळे आता २७ तारखेला नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com