praful patel saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांनी जे पाऊल उचललंय त्याचेही स्वागत करावं, रोहित-अजित पवार भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

रोहित-अजित पवार भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

Vishal Gangurde

शुभम देशमुख

Gondia News: राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे आज शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ते पहिल्यांदाच गोंदिया आपल्या स्वगावी आले. यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी 'अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर मी त्यांचं स्वागत करेल, असे वक्तव्य केले होते. यावरून प्रफुल्ल पटेल यांना प्रश्न केला असता 'रोहित पवार यांनी अजित पवार यांनी जे पाऊल उचलले आहे, त्याचे देखील स्वागत करायला पाहिजे, अशी त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे', असे वक्तव्य केलं. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी पक्षावर दावा केला आहे. तर अजित पवार गटाने महाराष्ट्रभर शपथपत्र भरून घेत आहे. याविषयीही प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर शपथपत्र भरून घेत आहे. हा एक निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे. तर भविष्यात याचा फायदा राष्ट्रवादीला होण्यासाठी महाराष्ट्रासोबत जिल्हा आणि तालुक्यामध्ये सध्या गटाकडून शपथपत्र कार्यकर्त्यांकडून भरून घेण्याचा काम हे सुरू आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात वक्तव्य केले.

दरम्यान, नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादीच्या फुटीर नेत्यांना आता महाराष्ट्राची सत्ता काबीज करायची आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, कोणी काय म्हटलं या कडे मी लक्ष देत नाही, परंतु महाराष्ट्राचा अजित पवार यांच्यासारखा नेता कर्तबगार नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा ही माझी आजीही इच्छा आहे'.

एक कर्तबगार नेतृत्वाला महाराष्ट्र कधीतरी संधी देईल : प्रफुल पटेल

'अजित पवार हे मुख्यमंत्री होण्याची वक्तव्य वारंवार होऊ लागली आहेत. आमदार संजय शिरसाट यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायला 20 वर्षे लागतील, असे वक्तव्य केले. त्यावर प्रफुल पटेल यांनी मी एकनाथ शिंदेंना आज हटवा, असं म्हटलं नाही तर एक कर्तबगार नेत्याला महाराष्ट्र कधीतरी संधी देईल, असा विश्वास मला आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

David Warner: डेव्हिड वॉर्नरवरील लाईफटाईम बॅन हटवला! आता कर्णधार होण्यासही सज्ज

NCP Ajit Pawar : अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर; सात नावांचा समावेश

Armaan Malik: युट्युबर अरमान मलिकने केलं चौथं लग्न? करवा चौथच्या त्या व्हिडीओमुळे एकच चर्चा

SCROLL FOR NEXT