Electricity Pole संजय डाफ
महाराष्ट्र

नागपूर विद्युत विभागानं कापली वीज; 200 ग्रामपंचायती अंधारात!

ग्रामपंचायतींचे काम ठप्प

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

संजय डाफ

नागपुर: जवळपास 200 ग्रामपंचायतील मधील वीज पुरवठा विद्युत विभागानं खंडित केलाय. त्यामुळं या ग्रामपंचायती अंधारात गेल्या आहेत. ग्रामपंचायतींचे (Gram Panchayat) काम ठप्प झाले आहेत, तर पथदिवे बंद असल्यानं रात्रीच्या वेळी रस्त्याने काळोखात जावं लागतंय.

मुळात ग्रामपंचायतीचे वीजबिल जिल्हा परिषद मार्फत भरलं जातं. मात्र, शासनाकडून अद्याप जिल्हा परिषदेला निधी मिळाला नाही. त्यामुळं जिल्हा परिषदेला बील भरता आलं नाही. अशात विद्युत विभागानं काहीही अवधी न देता सरळ वीज कापली. त्यामुळं सरकारी अनास्थेचा फटका ग्रामपंचायतींना बसतोय. जिल्हा परिषद ने लवकरात वीज भरावं आणि त्यापूर्वी विद्युत विभागानं विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सरपंच सेवा महासंघाने केलीय.

दरम्यान, राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी ही बाब दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. लवकरच हा सोडवून ग्रामपंचायत मधील वीज पुरवठा पूर्ववत होईल, असा विश्वास केदार यांनी व्यक्त केला.

हे देखील पाहा-

राज्य सरकारचा (State Government) भोंगळ कारभार आणि विद्युत विभागाच्या मनमानी मुळं ग्रामपंचायती अंधारात गेल्याय. सरकारी अनास्थेचा फटका ग्रामपंचायतींना बसतोय. सरकार राजकारण व्यस्त आहे. परिणामी ग्रामीण भागात काय चाललंय, याचं भान त्यांना नाही. त्यामुळं ग्रामीण भागात विशेष।लक्ष देऊन हा प्रश्न ताबडतोब सोडविण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT