नागपुर: देशातील अनेक राज्यांमध्ये वीजनिर्मितीसीठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वीजसंकट निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात वीजकपात होऊ शकते. राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. राज्य सरकारने कोल कंपन्यांचे सुमारे २८०० कोटी रुपये थकवले त्यामुळे महाराष्ट्र अंधारात जायची वेळ आलीय असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. (Power crisis: "State government has spent Rs 2,800 crore on coal companies" said Former Energy Minister)
हे देखील पहा -
आपल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकारचे तिन्ही कंपन्यांशी ताळमेळ नाही. कोळसा लिफ्टींगची परवानगी न दिल्याने ही वेळ आली आहे. ऊर्जा विभागाने कोळशाचं योग्य नियोजन केलं नाही. कोळशाचा पुरेसा साठा न केल्याने ही वेळ आली आहे. महाजेनको कंपनीकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाही. त्यामुळे गरज भासल्यास मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी महाजेनको कंपनीला ४-५ हजार कोटी कर्ज द्यावे. आमचं सरकार असतं तर तातडीने २८०० कोटी रुपये दिले असते, दिल्लीत जाऊन बसलो असतो आणि कोळसा मिळवला असता. आमचं सरकार असतं तर ही वेळ आली नसती, शेतकऱ्यांना वीज दिल्याने कधीही वीज कंपनी घाट्यात येत नाही असंही ते म्हणाले.
दरम्यान कोळशाच्या अभावी सध्या राज्यातील अनेक वीज उत्पादन केंद्र ही पुर्ण क्षमतेनं वीज तयार करु शकत नाही. त्यामुळे अनेक भागांत लोडशेडींग चालू झाले असून जर कोळसा वेळेत मिळाला नाही तर अनेक गावं ही अंधारात जाऊ शकतात. त्यामुळे महावितरणने याआधीच वीज जपून आणि काटकसरीने वापरण्याचं आवाहन केलं आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.