कोळसा उत्पादनात घट झाल्यानं राज्यावर वीजसंकट... Saam Tv News
महाराष्ट्र

कोळसा उत्पादनात घट झाल्यानं राज्यावर वीजसंकट...

चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांशी कोळसा खाणी या भूतल आहेत. त्यामुळं पावसाचं पाणी त्यात साचतं आणि उत्पादन ठप्प होतं. त्यामुळे राज्यावर वीजसंकट ओढावले आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर: कोळशाच्या उत्पादनात आणि वाहतुकीत कमालीची घट झाल्यानं राज्यातील वीज केंद्रे संकटात सापडली आहेत. राज्यातील विजेची मागणी वाढत असताना या संकटामुळे ती निम्म्यावर आली आहे. गेल्या महिनाभरापासून ही स्थिती कायम आहे. (Power crisis in the state due to decline in coal production)

हे देखील पहा -

चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता येथील बहुतांशी कोळसा खाणी या भूतल आहेत. त्यामुळं पावसाचं पाणी त्यात साचतं आणि उत्पादन ठप्प होतं. ही स्थिती या पावसाळ्यात अनेकदा निर्माण झाली. त्यामुळे चंद्रपूर वीज केंद्राला आवश्यक कोळसा पुरवठा होऊ शकलेला नाही. चंद्रपूर वीज केंद्राची कोळशाची मागणी 35 हजार टन प्रतिदिन एवढी आहे. मात्र हा पुरवठा होत नसल्याने इथले सातपैकी केवळ पाच संच सुरू आहेत त्यामुळे क्षमतेच्या निम्मी वीजनिर्मिती सुरू आहे. हीच परिस्थिती राज्यातील इतर औष्णिक वीज केंद्रांची आहे. केवळ एक ते दोन दिवस पुरेल एवढाच साठा सध्या वीज केंद्रांकडे शिल्लक आहे. त्यामुळं राज्यावरील वीज संकट चांगलंच गहिरं होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात चंद्रपूरसह कोरडी, खापरखेडा, पारस, भुसावळ, परळी व नाशिक असे सात केंद्र आहे. येथून राज्यभरात वीजपुरवठा केला जातो. मात्र पावसाळ्यामुळे कोळसा खाणीतून कोळसा काढण्यास अडचणी येत आहे. तर वाहतुकीची समस्याही वाढली आहे. एकूणच याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला आहे. कोळश्याअभावी राज्यात कोरडी औष्णिक केंद्राचे 620 मेगावॅटचे युनिट 6 बंद आहेत. चंद्रपूर युनिट 4 बंद, नाशिक 5 युनिट बंद, खापरखेडा युनिट 1 आणि 2 हे सर्व संच आपत्कालीन परिस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे राज्यावर वीजसंकट ओढावले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT