Gulabrao Patil saam tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil News: गुलाबराव पाटलांना शोधणाऱ्यास 51 रुपयांचं बक्षीस! गावागावात झळकले पोस्टर; कारण....

Maharashtra Politics: ठाकरेंच्या सभेपूर्वीच संजय राऊत (Sanjay Raut) आणि गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहेत.

Gangappa Pujari

Gulabrao Patil Poster In Buldhana: शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज जळगावाच्या पाचोऱ्यात सभा होत आहे. या सभेपूर्वीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहेत.

एकीकडे गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाची सभा उधळण्याचा इशारा दिला असतानाच बुलढाण्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील हरवले आहेत. अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच पाटील यांना शोधून देणाऱ्याला 51 रुपयांचं बक्षीस असा मजकूर या पोस्टरवर आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे जळगाव आणि बुलढाणा या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते बुलढाण्यात फिरकलेच नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी बुलढाण्यातील गावागावात पालकमंत्री बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावले आहेत. तसेच पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यांना पैसेही जाहीर केले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये सध्या या पोस्टर्सची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

पोस्टरवर गुलाबराव पाटील यांचा फोटो आहे. त्यावर पालमंत्री बेपत्ता असे लिहल्याचे दिसत आहे. तसेच संपर्कासाठी प्रशांत डिक्कर यांनी स्वत:चं नाव आणि मोबाईल नंबर दिला आहे. गावागावातील नाक्यानाक्यावर, चहा आणि पान टपऱ्यांवर हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सची सध्या बुलढाण्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

संजय राऊतांनी केला मोठा आरोप...

दरम्यान, आज जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. त्याआधी गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. सभेआधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी कोरोनाच्या नावाने जळगाव जिल्ह्यात तब्बल 400 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष

Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त | VIDEO

Constant Stomach Pain : सतत पोटोत दुखतंय? होऊ शकतात हे गंभीर आजार

Railway: आता जनरल डब्यात मिळणार लगेच सीट, प्रवाशांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Beed Crime : व्हिडिओ व्हायरल का केला?, जाब विचारणाऱ्या मित्राचेच बोटे छाटली; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT