Politics: सरकार जे बोलतेय ते कृतीत दिसत नाही: देवेंद्र फडणवीस
Politics: सरकार जे बोलतेय ते कृतीत दिसत नाही: देवेंद्र फडणवीस  
महाराष्ट्र

Politics: सरकार जे बोलतेय ते कृतीत दिसत नाही: देवेंद्र फडणवीस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय डाफ

''सरकारला थकीत वीज बिलाची सावकारासारखी जबरदस्तीने वसुली कारायची आहे, म्हणून सरकार कडून बाऊ केला जात आहे, कोरोना मुळे एकीकडे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी सरकार त्यांच्याकडून जबरदस्तीने वसुली करायची असल्याने हे नाटक सुरू आहे,'' अशी टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. ऊर्जा मंत्र्यांनी जे प्रेझेन्टेशन केले, त्यातून स्पष्ट होते की त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

हे देखील पहा-

आता निवडणुका लागल्या त्यामुळे आम्ही त्याला सामोरं जाऊ, मात्र सरकार जे बोलतेय ते कृतीत दिसत नाही हे यातून स्पष्ट झाले आहे. असे स्पष्टीकरणही फडणवीसांनी यावेळी दिले आहे. तर, कुंभकोणी संदर्भातला प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, कारण कुंभकोणी यांना मुख्यमंत्र्यांनी अपॉईंट केले आहे, ते मागील सरकारचे कंटिन्यू झालेले ऍडव्होकेट जनरल नाही, मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात त्यांना अपॉईंट केलं. असा त्यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत दादा पाटील यांनी आधीच स्पष्ट केले आहे की प्रवीण दरेकर बोलीभाषेत असं बोललं आहे, त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढणं योग्य नाही. सध्या एनसीपी कडे कुठले मुद्दे नाहीये, त्यामुळे असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. असा खुलासाही त्यांनी केला आहे.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

Sangli News: पैज लावाल तर तुरुंगात जाल! निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

Special Report | शिंदेंना भाजपचा मुख्यमंत्री म्हणून विरोध! राऊतांच्या दाव्याने राजकीय भूकंप येणार?

SCROLL FOR NEXT