Politics : महाज्योती मध्ये वडेट्टीवारांचा भ्रष्टाचार : प्रकाश शेंडगे  SaamTvNews
महाराष्ट्र

Politics : महाज्योती मध्ये वडेट्टीवारांचा भ्रष्टाचार : प्रकाश शेंडगे

नागपूर फ्लाईंग क्लब या 4 वर्षापूर्वी बंद पडलेल्या कंपनीला ओबीसी विद्यार्थ्यांचे विमान प्रशिक्षणाचे काम देऊन मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अडीच कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : नागपूर येथील नागपूर फ्लाईंग क्लब या 4 वर्षापूर्वी बंद पडलेल्या कंपनीला ओबीसी विद्यार्थ्यांचे विमान प्रशिक्षणाचे काम देऊन मागास प्रवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अडीच कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप माजी आमदार तथा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. बहुजन कल्याण मंत्रालयाअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती सुरू करण्यात आली आहे. मात्र, यात वडेट्टीवार यांनी अडीच कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला आहे.

हे देखील पहा :

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा महाज्योती कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मा.आमदार शेंडगे यांनी दिला आहे. शेंडगे हे उस्मानाबाद येथे ओबीसी आरक्षण संदर्भात बैठक घेण्यासाठी आले होते. नागपूर फ्लाईंग क्लबला अडीच कोटी देऊन 6 महिने झाले आहेत. ही प्रशिक्षण कंपनी बंद पडली असून यांच्याकडे स्वतःचे विमान देखील नाही. तसेच अद्याप एकाही विद्यार्थीला प्रशिक्षण दिले गेले नाही.अश्या प्रशिक्षण केंद्राला अडीच कोटी दिले असल्याचा आरोप त्यांनी केला. शेंडगे यांनी आरोप केल्याने महाज्योतीची विमान प्रशिक्षण योजना व मंत्री वडेट्टीवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

भीक मागून डेटा गोळा करण्यासाठी पैसे उपलब्ध करून देऊ :

ओबीसी आरक्षणाबाबत इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सरकारकडे निधी नसेल तर आम्ही भीक मागून पैसे गोळा करून आयोगाला देऊ मात्र इम्पेरिकल डेटा गोळा करा असा खोचक टोला माझी आमदार शेंडगे यांनी राज्यसरकारला लगावला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाला आरक्षण नाही त्यांच्या चुकांची शिक्षा ही संपूर्ण समाज भोगत असून यामुळे युवकांचे आयुष्य उध्वस्त होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात २६ मे पासून वाढ

Crime: शिंदेसेनेच्या आमदाराच्या PA ला गोव्यात मारहाण, कुटुंबीयांनाही सोडलं नाही

Palak Paneer Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल स्वादिष्ट पालक पनीर रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

वंशाचा दिवा मुलगाच हा समज खोटा, विज्ञानाने दिला धक्का; आईकडूनच पुढे जातो खरा DNA

Keratin vs Hair Botox: केराटिन आणि हेअर बोटॉक्समध्ये नेमका काय फरक? केसांसाठी काय ठरतं फायदेशीर?

SCROLL FOR NEXT