Shinde Sena leaders face controversy ahead of civic elections, increasing pressure on Eknath Shinde. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढली; शिंदेसेनेचे 2 नेते अडचणीत, पालिका निवडणुकीत फटका बसणार?

Shinde Sena Two Leaders In Trouble: पालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असताना शिंदे सेनेच्या काही नेत्यांच्या कारनाम्यांनी एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार आहे. वादग्रस्त वक्तव्यांनी पक्षाला फटका बसू शकतो. पाहूया यासंदर्भांतला एक खास रिपोर्ट.

Girish Nikam

  • शिंदेसेनेचे दोन नेते वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत

  • वादामुळे महायुतीच्या निवडणूक समीकरणांवर परिणाम होऊ शक्याता आहे.

  • निवडणुकीच्या तोंडावर पक्षात नाराजी

पालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील धुसफूस सातत्यानं समोर येतेय. तिन्ही पक्षातील काही नेते स्वबळाची भाषा करत असतानाच एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढताना दिसतायेत. मोठ्या नेत्यांच्या कारनाम्यांनी पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. पवईतील ओलीसनाट्यादरम्यान रोहित आर्यनं माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याची मागणी केली होती.

मात्र केसरकरांनी आर्यशी बोलण्यास नकार दिल्याचा दावा एका आयपीएस अधिकाऱ्याने केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी केसरकरांची चौकशी होण्याची शक्यता आहे. केसरकरांनी वेळीच संवाद साधला असता तर रोहित वर्माला वाचला असता, अशी चर्चा सुरु झालीय.

दुसरीकडे शिंदे सेनेचे मुंबईतील मागाठाणे मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांनीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय मतांवर डोळा ठेऊन वादग्रस्त वक्तव्य केलंय. मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे, अशी मुक्ताफळं उधळलीयेत. मतांच्या लाचारीसाठी सुर्वे यांनी वक्तव्य केल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय.

काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनीही हिंदी आपली लाडकी बहिण आहे. मी हिंदी बोलतो, तुम्हीही बोला असं वक्तव्य केलं होतं. मुंबई, ठाण्यात उत्तर भारतीय मतांची मोठी संख्या आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे नेते अशी विधानं सर्रास करत आहेत. मात्र पालिका निवडणुकीत ही वादग्रस्त वक्तव्य पक्षाला अडचणीची ठरणार आहेत. विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. म्हणून एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार आहे. आगामी निवडणुकीत अटीतटीची लढत असल्यानं शिंदे डॅमेज कंट्रोल कशा पद्धतीने करतात ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लातूर हादरलं! मेडिकलमध्ये औषध आणायला गेलेल्या ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

Shocking : चालक आणि नर्सच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट! गर्लफ्रेंडनेच कुऱ्हाडीने वार करून बॉयफ्रेंडला संपवलं

Maharashtra Live News Update: कल्याणातील रिंगरोड टप्पा ३ च्या कामाला वेग,आठ महिन्यांत पूर्णत्वाचा निर्धार

Rice Eating Tips : दुपारी की रात्री; भात खाण्याची योग्य वेळ कोणती?

Government Employees: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे नियम केले स्पष्ट; पेन्शनसाठी होणार फायदा

SCROLL FOR NEXT