BJP leader Bala Bhegade addressing a public meeting in Vadgaon, launching a sharp attack on NCP MLA Sunil Shelke. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बेट्या जेवढं तुझं वय आहे ना..., भाजपचे माजी मंत्री आणि अजित पवारांच्या आमदाराचा एकमेकांवर जोरदार प्रहार

Bala Bhegade Vs Sunil Shelke Political Controversy: मावळमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यात जोरदार शब्दयुद्ध रंगले आहे.

Omkar Sonawane

महापालिकानिवडणुकीनंतर आता झेडपी आणि पंचायत समितिच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी राज्य मंत्री बाळा भेगडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बाळा भेगडेना भाजपमध्ये कोण विचारते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर कोणाला किती किंमत दिली जाते? भाजपच्या वारिष्ठांकडून युतीबाबत मला का विचारणा होते? असे म्हणत शेळकेनी भेगडेंची खिल्ली उडवली.

यावरच आता बाळा भेगडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. बेट्या जेवढे तुझं वय आहे ना.... मी असं बोललो नाही आणि मला असं बोलायचं नाही. एकच सांगतो माझं दैवत देवा भाऊ आहे. तुम्हाला आमची ताकद बघायची आहे ना सात तारखेनंतर तुमची टिकटिकच बंद करतो आणि आमची ताकद दाखवून देतो. नंतर बाळाभाऊ बाळाभाऊ मामा मामा करू नको.. आत्ता मामा जागा झाला. असा जोरदार प्रहार बाळा भेगडे यांनी केला. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते की बाळा भेगडे यांना मावळात कोण ओळखतो यावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले ही तर सुरुवात आहे.

कारण मावळमधील आपल्यापुढे जी पंचायत समितीची इमारत तयार केली आहे. ते तयार करण्याचे भाग्य मला लाभलेल आहे. इथे भाजप शिवसेना युतीच्या सुवर्णाताई सभापती म्हणून बसणार हे नक्की. मावळात लय गमती जमती सुरू आहे. मला भाजपचे मुंबईतील नेत्यांना हा फोन करतो आणि तो फोन करतो हे मला सांगितलं जातं. आज मावळच्या जनतेच्या साक्षीने शब्द देतो. यापुढे आमदार तूला भाजपच्या कोणत्याही नेत्याचा फोन येणार नाही. बाळा भेगडेचा शब्द आहे.

भाजपच्या वरच्या नेत्यांना एवढं सांगू नको की पूर्वी मी भाजपचाच होतो. असं बोलू नको आणि इकडे मावळात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आहे. वर जायचं मी तुमचाच आहे मला निधी द्या. निधी आणायचा देवाभावकडून आणि इथे सांगतो मी अजितदादा कडून निधी आणला. अशी जोरदार टीका बाळा भेगडे यांनी केली.

पुढे ते म्हणाले, एखाद्याला वाटतं जसं सूर्य उगवल्यानंतर माझ्यामुळेच उगवला, मावळचा विकास माझ्यामुळेच झाला. अशी जोरदार टीका माजी मंत्री बाळ वेगळे यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक च्या पार्श्वभूमीवर आज मावळच्या वडगाव मध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी ही भाजपची सभा झाली त्यावेळेस ते बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये मनसेचे नगरसेवक शिंदे गटासोबत गेल्याने ठाकरे गट संतप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! ‘ई-केवायसी’ चुकली तरीही मिळणार लाभ,फक्त करा 'हे' काम?

Crime: धारदार शस्त्रानं आधी पोट फाडलं, नंतर गुप्तांग कापून झाडाला लटकवलं; महिलेने बॉयफ्रेंडला दिला भयानक मृत्यू

'लेडी बॉस'च्या मृत्यूचं गूढ उलगडलं; कर्मचाऱ्यानेच पेट्रोलने टाकून जाळलं अन् रचला अपघाताचा बनाव, धक्कादायक कारण समोर

लेकाने आईला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, दोघांनी मुलाला छतावरून फेकलं, कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT