Akola MLA Nitin Deshmukh Saam Tv
महाराष्ट्र

Akola : ...तर राजीनामा देणार, आमदार नितीन देशमुखांनी भाजपवर आरोप करत केलं मोठं वक्तव्य

Akola MLA Nitin Deshmukh : अकोला महापालिका निवडणुकीच्या प्रचारात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपवर गुन्हेगार आणि वरली-मटका चालवणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप केला असून, आरोप खोटे ठरल्यास राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

Alisha Khedekar

  • अकोला महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल

  • गुन्हेगार आणि वरली-मटका चालवणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप

  • आरोप खोटे ठरल्यास राजीनामा देणारा

  • भाजप-एमआयएम युतीवरून राजकीय वाद तीव्र

अक्षय गवळी, अकोला

राज्यात येत्या १५ जानेवारीला मतदानाचा धुरळा उडणार असून प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. अशातच ठाकरे सेनेच्या आमदाराने भाजपवर जहिरीली टीका केली आहे. अकोला महापालिका निवडणुकीत भाजपने गुन्हेगार आणि हत्यारांसह वरली-मटका चालवणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी केला. हा आरोप खोटा असेल तर राजीनामा देणार असल्याचंही ते यावेळेस म्हणाले.

आमदार नितीन देशमुखांनी जयहिंद चौकातील पक्षाच्या प्रचारसभेतील भाषणात हे गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या नेत्यांनी एकही उमेदवार गुन्हेगार आणि वरली मटका चालवणारा नसला असं सिद्ध केलं तर, आपण आमदारकीचा राजीनामा देऊ असं आमदार देशमुखांनी म्हटलं आहे.

आज गोरगरिबांचे घर उध्वस्त करून वरली मटक्यावर घर भरणारे लोक निवडणुकीच्या मैदानात आहेत, त्यांना धडा शिकवला पाहिजे असं आवाहनही नितीन देशमुखांनी अकोलेकरांना केलं आहे. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये 'भाजप-एमआयएम' युतीचा दुसरा अंक काल पहायला मिळाला होताय. त्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी भाजपवर निशाणा साधला. आधी एमआयएम'ला सोबत घेतले, आता हद्दचं पार केली आहे.

भाजप नेत्याच्या मुलाला स्विकृत नगरसेवकपदासाठी 'एमआयएम'कडून समर्थन घेतले. हे काय चाललंय? असा प्रश्न आमदार देशमुख यांनी उपस्थित केलाय. 'एमआयएम'ने भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं, असे स्थानिक भाजपचे नेते म्हणतात, मग हिंदुत्वाच्या नावावर मत मागण्याचा सवालचं उद्भवत नसल्याचे देशमुख म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack: हार्ट अटॅक अचानक कधीच येत नाही; या ४ गोष्टी वाढवतात धोका, अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

Maharashtra Live News Update : पिंपरी चिंचवड शहरात शेवटच्या दिवस अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भोसरीमध्ये जाहीर सभा

मतदानाला काही तास शिल्लक..., माजी महापौरांसह 54 बड्या नेत्यांची हकालपट्टी, भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना झटका! मकरसंक्रांतीला जानेवारीचे ₹१५०० मिळणार नाहीत; वाचा अपडेट

Crime News : गुप्त माहिती मिळवली, खासदाराला ब्लॅकमेल करून ५ लाखांची खंडणी मागितली; बोगस आयटी कर्मचाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT