Raj Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Big Blow to MNS: रायगडमध्ये राज ठाकरे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वीच बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले.

Priya More
  • रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का

  • राज ठाकरे दौऱ्यापूर्वी मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

  • मनसे नेते कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष

  • रायगडच्या राजकारणात चर्चांना उधाण

रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का बसला. राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी बड्या नेत्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी राजिनामे दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हे सर्व पदाधिकारी कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप समोर आले नाही. पण सत्ताधारी भाजप किंवा शिंदेसेनेत ते जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमध्ये मनसेला मोठा धक्का बसला. ९ ऑगस्ट रोजी राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याला ८ दिवस बाकी असतानाच राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला. जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले. त्यामुळे रायगडमध्ये मनसेची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

राजीनामा दिलेल्यांमध्ये मनसे माजी रायगड संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे, विद्यार्थी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रतिक रहाटे, रोहा तालुका अध्यक्ष बाबू फुलारे, माथाडी अध्यक्ष राजा टेंबे या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांनी पक्षातील पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पत्राद्वारे राज ठाकरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती आहे.

मनसेमध्ये नव्याने झालेले पदाधिकारी फेरबदल आणि कार्यपद्धतीवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण रायगडमध्ये मनसेत राजीनामा सत्र सुरु झाल्याने रायगडमध्ये चर्चांना उधाण आले आहे. मनसेचे हे नाराज पदाधिकारी सत्तेत असलेल्या शिंदेसेनेकडे जाणार की भाजपकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात महाविकास आघाडीचं सेव्ह डेमोक्रसी संयुक्त आंदोलन

RRR चा धमाका! राहुलचे वादळी शतक; ऋतुराजची संयमी खेळी अन् रोहितचा तडाखा, विडिंजसमोर विराट आव्हान

Pitru Paksha: पितरपाठात 'या' ३ वस्तू घरी आणा; पितरांचा मिळेल आशीर्वाद

Drishyam 3 : 'दृश्यम ३'चा बॉक्स ऑफिसवर महाधमाका! पहिल्याच दिवशी तोडले 7 रेकॉर्ड्स; जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Mumbai : शरीरात मेणाच्या कॅप्सूल अन् विमानतळ कर्मचाऱ्याची साथ, 13.73 कोटींचे सोने-हिरे जप्त

SCROLL FOR NEXT