Tanaji Sawant on Balasaheb Thackeray  Saam TV
महाराष्ट्र

Tanaji Sawant on Balasaheb Thackeray : 'बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते सावंत बंधूंनी करुन दाखवलं, तानाजी सावंत यांचं धक्कादायक वक्तव्य

Tanaji Sawant : त्यांच्या या वक्तव्याने शिवसेनेत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.

भरत नागणे

Political News : मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यांवारून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. एकीकडे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात सातत्याने वाद उफाळून येत असताना आता तानाजी सावंत यांनी चक्क हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते सावंत बंधूंनी करुन दाखवलं, असं सावंत यांनी म्हटलं आहे. आता त्यांच्या या वक्तव्याने शिवसेनेत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. (Pandharpur)

काय म्हणाले तानाजी सावंत?

पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा झाल्या. त्यांच्या सभांना जितकी गर्दी जमली नाही,त्यापेक्षा अधिक गर्दी सावंत बंधूनी याच मैदानावर जमवून दाखवली, असं मोठं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.

साल 2018 मध्ये उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा पंढरपूर येथील चंद्रभागा मैदानावर झाली होत. या सभेचे नियोजन मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे होते. या सभेला सात लाख लोक आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अलीकडेच मालेगाव येथील उध्दव ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. त्या सभेला उद्देशून बोलत असताना सावंत यांनी जे बाळासाहेबांना जमलं नाही ते सावंत बंधूनी पंढरपुरात करुन दाखवल्याचे सांगत उध्दव ठाकरे यांना‌ टोला‌ लगावला आहे.

सोलापूरच्या पालकमंत्रीपदासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आग्रही

सोलापूरच्या पाकमंत्री पदावरुन भाजप आणि शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री पद मागत होतो,परंतु मला धाराशिव आणि परभणीचे पालकमंत्री केले हे माझे दुर्देव असल्याची खंत व्यक्त करत, अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा मला सोलापूरचे पालकमंत्री पद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पालकमंत्री पदावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT