sujay vikhe patil, eknath shinde, congress, maharashtra government saam tv
महाराष्ट्र

Sujay Vikhe Patil : "शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ ढीली झाली"; सुजय विखे पाटीलांचं टीकास्त्र

जयंत पाटील यांनी जे काल वक्तव्य केले आहे त्यावरून ते ही राष्ट्रवादी सोडून जातील असे वाटते, असं सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे.

भरत नागणे

Political News : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमुठ ढीली झाल्याची टीका करत, जयंत पाटील यांनी जे काल वक्तव्य केले आहे त्यावरून ते ही राष्ट्रवादी सोडून जातील असे वाटते, असं सुजय विखे पाटलांनी म्हटलं आहे. (Sujay Vikhe Patil)

सुजय विखे पाटील आज श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. शरद पवार यांचा राजीनामा ही पक्षांतर्गत बाब आहे. जशी समुद्राची वाळू मुठीत घट्ट पकडल्यानंतर ती तितक्याच्या वेगाने ढीली होते. त्या प्रमाणे महाविकास आघाडी वज्र मुठ आहे, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी केली.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आधिच निम्मा कार्यक्रम केला आहे. आता राहिलेला कार्यक्रम करतील असा टोला ही खासदार विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचाही राजीनामा

शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यावर काल अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशात आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील राजीनामा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT