Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : कोल्हापुरात शेतकरी आक्रमक, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊसाच्या कांड्या फेकल्या

Kolhapur News : कोल्हापुरात ऊस दराच्या प्रश्नावरून शेतकरी संतापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

Alisha Khedekar

ऊस दर आणि एफआरपी प्रश्नावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा संताप

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न

पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली

शेतकरी संघटनांचे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता

पुणे-बंगळुरू महामार्ग काही काळ ठप्प

ऊस दराच्या प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली.

मागील काही दिवसांपासून ऊस दराबाबत कारखानदार, शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्यात संघर्षाची स्थिती आहे. अशातच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान घटनास्थळी कडक बंदोबस्त असतानाही पोलिसांच्या समोरच हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या घटनेमुळे काही काळ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन उसाच्या कांड्या बाजूला केले.

यावेळेस आंदोलकांनी महामार्गावर उसाच्या कांड्या भरलेली पोती टाकून निषेध नोंदवला. एकरकमी एफआरपी आणि साखर कारखानदारांची आडमुठी भूमिका यावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप उसळल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गॅस टंचाईच्या मुद्द्यावर ठाकरेसेनेचे नाशिकमध्ये आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

पोटाची खळगी भरण्यासाठी रिक्षा चालवणारी 'हिरकणी' आई; ३ वर्षांच्या मुलीसोबत कष्टमय झुंज

Pak vs Ban : रन आऊटवरून 'रणकंदन'! पाकिस्तान-बांगलादेशी खेळाडूंमध्ये मैदानातच राडा, सलमान आगा भडकला, ग्लोव्ह्ज आपटले, हेल्मेट फेकला

चिकन आणि मटणाची दुकाने ३ दिवस बंद राहणार, प्रशासनाकडून आदेश जारी

Chanakya Niti: 'या' सवयींच्या लोकांना घरात बोलवणं पडेल महागात, कधीच मिळणार नाही यश; चाणक्यांचा महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT