Maharashtra Political News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political News: भाजपात रामदास आठवलेंचाच शब्द चालणार...; बड्या नेत्याचं विधान

: विखे पाटलांनी रामदास आठवले यांच्यासमोर त्यांच्याच शैलीत काव्य सादर करत त्यांचं कौतुक केलंय.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे, शिर्डी

Latest Political News: शिर्डी येथे पार पडलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली. यावेळी विखे पाटलांनी रामदास आठवले यांच्यासमोर त्यांच्याच शैलीत काव्य सादर करत त्यांचं कौतुक केलंय. (Latets Ramdas Athawale News)

मध्यंतरी अनेक पक्ष वेगवेगळ्या कारणांनी एनडीएमधून बाहेर पडले. मात्र दुसऱ्या बाजूला रामदास आठवले ठामपणे भाजपसोबत उभे राहिले. " सत्तेच्या स्पर्धेत किती आले आणि किती गेले. भाजपसोबत राहिले फक्त रामदास आठवले, अशा काव्य शैलीत राधाकृष्ण विखे पाटीलांनी आठवलेंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

शिवशक्ती - भिमशक्ती याची ताकत साऱ्यांना दाखवू आणि २०२४ ला मविआचा पूर्ण सफाया करू, असा इशारा विखे पाटीलांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.

रामदास आठवले अनेक वर्ष केंद्रात मंत्री आहेत. मात्र अद्याप त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. कार्यकर्त्यांनी आठवले साहेबांची चिंता करू नये, ती चिंता करायला आम्ही समर्थ आहोत. ते जसे तुमचे नेते आहेत तसे आमचेही नेते आहेत. आठवले साहेब जो आदेश देतील तो शिरसावंध मानून आम्ही काम करू, असे विखे पाटील रिपाई कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, मी त्यांना भाजपकडे घेऊन जातो.

प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे, मी त्यांना भाजपकडे (BJP) घेऊन जातो, आपण दोघे मिळून भाजपसोबत राहूया, उद्धव ठाकरेंकडे तुम्हाला काही मिळणार नाही...असे अवाहन रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना केलं आहे. शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आठवले यांनी हे आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT