Girish Mahajan Saam TV
महाराष्ट्र

Girish Mahajan On NCP Split : शरद पवारांचं मुलीवरील प्रेम राष्ट्रवादीतील बंडाचं कारण; गिरीश महाजनांची टीका

Political News : सध्या तरी अजित पवार यांचं पारडं जड असल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

भूषण अहिरे

Dhule News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर नेमका पक्ष कुणाचा असा पेच निर्माण झाला आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट पक्षावर आपला दावा सांगत आहेत. मात्र ज्याचे जास्त आमदार त्याचाच पक्ष म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचा दावा केला आहे. सध्या तरी अजित पवार यांचं पारडं जड असल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार यांचे मुलगी प्रेम कारण आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. जसं शिवसेनेमध्ये झालं तसंच राष्ट्रवादीमध्ये देखील झालं आहे. दोन्ही पक्षातील नेते परिवारवादामुळे लोक कंटाळले होते. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा अजित पवार यांच्याकडेच द्यायला हवी होती, परंतु शरद पवार हे मुलीच्या प्रेमात पडले, त्यांना मुलीचा मोह झाला. त्यामुळे आणि सर्वच जबाबदाऱ्या या सुप्रिया ताईंनाच देण्यात आल्याने त्यांचे उजवे डावे हात देखील नाराज झाले. त्यातूनच हे बंड झाले असल्याचं गिरीश महाजन म्हटलं. (Latest Political News)

पहाटेच्या शपथविधीनंतर आता दुपारचा शपथविधी फसणार नाही. पहाटेच्या शपथविधी दरम्यान त्यावेळी थोडी चूक झाली. अजितदादांनी देखील त्यावेळी प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी त्यांच्यासोबत आलेले सात जण देखील टिकले नाहीत. परंतु आता 40हून अधिक आमदार आहेत आणि आता अजितदादांनी पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे दुपारचा शपथविधा आता फसणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT