ShivSena - BJP
ShivSena - BJP Saam Tv
महाराष्ट्र

BJP Leader's Criticism: 'गद्दार ते गद्दारच शेवटी', भाजप नेत्याच्या शिवसेना खासदारावरील टीकेने खळबळ

अभिजीत सोनावणे

Nashik News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. शिंदे गटाच्या आमदार खासदार गद्दारी करुन भाजपसोबत गेल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. मात्र भाजप खंबीरपणे शिंदे गटाच्या पाठिशी असल्याचं नेहमीच दिसलं. मात्र आता भाजप नेत्यानेच शिंदे गटाच्या नेत्याला गद्दार म्हटल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप-शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवार दिनकर आण्णा पाटील यांनी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर टीका केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत शिवसेना खासदारांवर टीका करण्यात आली आहे. (Maharashtra Political News)

नाशिक लोकसभेच्या जागेवरून निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपत वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नगरसेवकाने शिवसेनेच्या खासदाराचा गद्दार म्हणून उल्लेख करत पोस्टमधून टीका केली आहे. (Latest Marathi News)

BJP Leader Post

पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

“रोज थापा, रोज घोषणा, कान आमचे विटले आहेत. गद्दार ते गद्दारच शेवटी, आता साऱ्यांना पटले आहे. हालअपेष्ठा सहन करत, नागरिक सारे वैतागले आहेत. काम नाही नुसत्या गप्पा, भ्रष्टाचारात दंग आप्पा, गाव सारं पाहतं आहे. कारभारी बदलण्यासाठी, रान सारं पेटलं आहे. धडाडी आणि सचोटीचे आण्णा, पुढारी नाही, आधार उद्याचा, खासदार आता नाशिकचा, साऱ्यांचं ठरलं आहे!”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शुभमंगल सावधान! पोलीस ठाण्याच्या दारातच वाजली सनई, लातूर पोलिसांनी लावलं प्रेमीयुगुलाचं लग्न

Virat Kohli: सुनील छेत्रीच्या रिटायरमेंट पोस्टवर विराटची भावुक करणारी प्रतिक्रिया

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? जाणून घ्या तो कसा ओळखायचा

6GB रॅम अन् 6000mAh बॅटरीसह लवकरच लाँच होणार Samsung Galaxy M35;जाणून घ्या फीचर्स

Kolhapur Airport News: पायलटची ड्युटी संपली, कंपनीने विमानच रद्द केले; प्रवाशांचे हालच हाल

SCROLL FOR NEXT