Sunetra Pawar announced as Mahayuti candidate for Baramati bypoll as political contest intensifies Saam Tv
महाराष्ट्र

Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

Maharashtra Political News : बारामती पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. फडणवीस आणि शिंदे यांनी बिनविरोध निवडणुकीचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

  • बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी

  • फडणवीस-शिंदे यांचे बिनविरोध निवडणुकीचे आवाहन

  • काँग्रेसने निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याने चुरस वाढली

  • लक्ष्मण हाके यांच्यासह इतर उमेदवारांमुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे माध्यमांशी बोलताना सांगितले की, अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पोटनिवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना याच भावनेतून सर्व पक्षांनी सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले.

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) बारामती पोटनिवडणूक लढवणार नसेल तर काँग्रेस महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत दिल्लीतील नेत्यांची देखील परवानगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बारामतीमधून काँग्रेसकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

एकीकडे काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असताना दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असून विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान आता ही पोटनिवडणूक कोणते नवे वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Suresh Borse Death : राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, संभाजीनगरमध्ये खळबळ

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई! २ कोटींचे ड्रग्स जप्त; दोघांना बेड्या

Heart Attack: हार्ट अटॅक येणारे हे लवकर कसं ओळखाल? 5 लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार पंढरपूरमध्ये दाखल, आंदोलनाला सुरुवात

पैशांची चणचण दूर करेल पिवळ्या चपातीचा 'हा' सोपा उपाय, महिनाभरातच व्हाल धनवान

SCROLL FOR NEXT