Political leaders engaged in intense negotiations amid the high-stakes Akola Mayor election. Saam Tv
महाराष्ट्र

महापौरपदावरून ट्विस्ट! आधी ठाकरे गटाची अन् भाजपची गुप्त बैठक, आता काँग्रेस मोठा डाव टाकणार

Secret Meetings New Alliances: अकोला महापालिकेत महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या गुप्त बैठकींमुळे अकोल्यात हाय व्होल्टेज पॉलिटिक्स रंगताना दिसत आहे.

Omkar Sonawane

अक्षय गवळी, साम टीव्ही

महापालिकेचा निकालानंतर आता महापौरपदासाठी सगळेच पक्ष बहुमतासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे. विदर्भातील आकोल्यामध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने गुप्त बैठकींचा सिलसिला सुरू असून आता मोठी बातमी समोर आली आहे.

अकोला महापालिकेत पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसने उबाठाला मोठा प्रस्ताव दिला आहे. 21 नगरसेवक असलेली काँग्रेस म्हणते आम्हाला कुठलंचं पद नकोय. पण भाजप विरोधात सर्वांनी एकत्र यावं असे आवाहन काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सर्वच पक्षांना केले आहे. उद्या गुरुवारी आमदार साजिद खान पठाण हे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेणारा असून आमची सर्वांची बोलणी सुरू आहे. तसेच अकोला महापालिकेत लवकरच सत्ता स्थापन करू असा दावा साजिद खान पठाण यांनी केला आहे.

अकोला महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 'हाय व्होल्टेज पॉलिटिक्स' रंगत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्यात बैठक पार पडली. तर 19 जानेवारीला भाजप आणि ठाकरेसेनेच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली होती. अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपने थेट ठाकरेंच्या शिवसेनेला 'ऑफर' दिली. त्यानंतर आता काँग्रेसने उबाठाला मोठा प्रस्ताव दिला आहे.

दरम्यान, 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाहीये. 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. दुसरीकडे काँग्रेसचे 21, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक आहे. सत्ता स्थापनेत महत्वाची आणि 'किंगमेकर'ची भूमिका वंचित आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेची ठरणार आहे. महापालिकेत 80 एकूण जागा असून सत्ता स्थापन करण्यासाठी 41 चा आकडा हा बहुमताचा आहे. या ठिकाणी भाजपला 38, काँग्रेस 21, उबाठा 06, शिंदेसेना 01, अजित राष्ट्रवादी 01, शरद राष्ट्रवादी 03, वंचित 05 एमआयएम 03, तर अपक्षांना 02 जागा मिळाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: भारतात या! नाहीतर वर्ल्ड कप विसरा; ICCची वॉर्निंग, बांगलादेशला हट्टीपणा पडला महागात

Shocking: खोलीत बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर जबरदस्ती गर्भपात; प्रसिद्ध कथावाचकाचा भयंकर चेहरा समोर

Maharashtra Live News Update: धनगर समाजाला ST प्रवर्गातील आरक्षण तात्काळ लागू करा; आमदार सोळंकेंचं CM फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेसेनेला मोठा धक्का, दिग्गज नेत्याच्या घरातूनच बंडखोरी, VIDEO

Republic Day 2026: मुलांना २६ जानेवारीला इतिहासाची ओळख करून देणारी मुंबईतली 'ही' वारसा स्थळे नक्की दाखवा

SCROLL FOR NEXT