Dharashiv News Saam Tv
महाराष्ट्र

Dharashiv News : बांधकाम व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, टोळीकडून लोखंडी रॉडने मारहाण; धाराशिवमध्ये खळबळ, CCTV व्हिडिओ चर्चेत

Crime News Dharashiv: धाराशीव शहरात राजकीय वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. बांधकाम व्यावसायिक पृथ्वीराज पाटील यांच्यावर लोखंडी पट्टीने हल्ला करण्यात आला असून ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Alisha Khedekar

धाराशीव शहरात राजकीय वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी

दुकानदार पृथ्वीराज पाटील यांच्यावर लोखंडी पट्टीने हल्ला

घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद

पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल नाही

धाराशीवमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरात एका बांधकाम व्यावसायिक दुकानात राजकीय वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही संपूर्ण हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हाती लागलेल्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजनुसार, धाराशिवमधील एका बांधकाम व्यावसायिक दुकानात दुकानदार पृथ्वीराज पाटील यांच्यावर हल्ला झाला. दुकानात बसलेल्या पृथ्वीराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर एका व्यक्तीने अचानक लोखंडी पट्टीने हल्ला केला. यानंतर पाटील यांच्या गटाने हल्लेखोर तरुणाला जोरदार मारहाण केली. हल्लेखोर आणि दुकानदार दोघेही वेगवेगळ्या पक्षांशी संबंधित कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे.

मारामारीचा हा थरार फारच भयानक होता. घडलेली संपूर्ण भयावह घटना बांधकाम व्यावसायिक पृथ्वीराज पाटील यांच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही मारामारी नेमकी का झाली? चानक झालेल्या या हल्ल्यामागील नेमके कारण काय? हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र हा वाद राजकीय मतभेदातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान इतका भीषण हल्ला होऊनही या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शिवाय या मारामारीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलीस दखल घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: लोकं तुमचा आदर केव्हा करतील? चाणक्यांनी सांगितल्या महत्त्वाच्या टीप्स

'आरोपीचा एन्काऊंटर करा', चिमुकलीवर बलात्कार- हत्या प्रकरणावरून मालेगाव तापले; कोर्टाबाहेर जमावाचा राडा

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये अजित पवारांंच्या राष्ट्रवादी आणि ठाकरेसेनेत राडा

Heels Crack in Winter: हिवाळ्यात पायाच्या टाचांना भेगा पडतात? मग, रोज रात्री करा 'हा' सोपा घरगुती उपाय

Shocking : "बाबा हॉस्टेलमध्ये मला... " कोचिंग क्लासमध्ये १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT