Actress Hemangi Rao Saam Tv
महाराष्ट्र

Raigad News: शिंदेंचा आमदार अडचणीत, अभिनेत्रीची पोलिस ठाण्यात धाव; नेमकं प्रकरण काय?

Shivsena Shinde Group: शिवसेना शिंदे गटाच्या आमदारावर मराठीअभिनेत्रीने गंभीर आरोप करत पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. ४ वेळा तक्रार करून देखील पोलिसही गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा आरोपही तिने केला आहे.

Priya More

सचिन कदम, रायगड

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराविरोधात अभिनेत्रीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. रायगडमधील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे. भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरीचा वापर केल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. यासंदर्भात अभिनेत्री हेमांगी राव यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री आणि सह अभिनेत्री म्हणून भूमिका साकारणाऱ्या हेमांगी राव यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील शिवसेनेचे आमदार आणि नवी मुंबई येथील एका व्यावसायिकाविरोधात खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भूखंड लाटण्यासाठी धमकावल्याचा आरोप आमदारावर करण्यात आला आहे. त्यामुळे आमदार थोरवे यांच्या समोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणाची चर्चा आता रायगडमध्ये होऊ लागली आहे.

अभिनेत्री हेमांगी राव आणि त्यांचे डॉक्टर पती विनोद राव यांची मुंबई- पुणे जुन्या महामार्गालगत खालापूर तालुक्यातील कांडरोली गावाच्या हद्दीत जमीन आहे. नवी मुंबई येथील व्यावसायिक विकासक दीपक वाधवा यांनी या जमिनीचा व्यवहार केला होता. मात्र काही कारणास्तव हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. मात्र तरी देखील वाधवा ही जमीन बळजबरीने आणि दादागिरीचा वापर करत हस्तगत करत असल्याचा आरोप राव कुटुंबांने केला आहे.

जमीन जबरदस्तीने बळकावण्यासाठी वाधवा यांना आमदार महेंद्र थोरवे हे मदत करत आम्हाला धमकावत असल्याचा आरोप अभिनेत्रीने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रार अर्जात केला आहे. पत्रकार परिषदेत या अभिनेत्रीने अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. ४ वेळा पोलिसांत तक्रार करुनही पोलिस याची दखल घेत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणाली बाबतही अभिनेत्रीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली असल्याचे देखील या अभिनेत्रीने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

Lunar Eclipse: वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण कधी? यावेळी कोणत्या गोष्टी कराव्या, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT