Samriddhi Highway Bus Driver Video  Saam TV
महाराष्ट्र

Jalgaon News: कानात हेडफोन, मोबाइलवर व्हिडिओ बघत समृद्धी महामार्गावर बस दामटली; आता 'कोंडी' केली

Bus Driver Video: कानात हेडफोन आणि मोबाइलवर व्हिडीओ पाहत समृद्धी महामार्गावरुन बस दामटवत असल्याचा एका खासगी बस चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Satish Daud

Samriddhi Highway Bus Driver Video

कानात हेडफोन आणि मोबाइलवर व्हिडीओ पाहत समृद्धी महामार्गावरुन बस दामटवत असल्याचा एका खासगी बस चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून या चालकाला अटक करण्यात आली आहे. इतकंच नाही, तर आरटीओने बस देखील जप्त केली आहे. (Latest Marathi News)

सेच खासगी बस ट्रॅव्हल्स कंपनीचा परवाना देखील रद्द करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. जळगाव आरटीओ कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्यासह त्यांच्या पथकाने संबंधित कारवाई केली आहे. धनंजय कुमार सिंग असं बसचालकाचं नाव आहे. पोलिसांच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.

काय आहे प्रकरण?

कानात हेडफोन आणि मोबाईलवर व्हिडीओ पाहत समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Highway) बस चालवत असल्याचा एका खासगी बसचालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बसमधील एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला.

पोलिसांनी या व्हिडीओचा शोध घेतला, तेव्हा व्हिडीओत दिसणारी बस जळगावातील संगीतम ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. इतकंच नाही, तर आरटीओने संगीतम ट्रॅव्हल्सची बस देखील जप्त केली.

ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ झाला, म्हणून आरटीओने संगीतम ट्रॅव्हल्सचा परवाना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. समृद्धी महामार्गावर अनेक खासगी बसचालक बेजबाबदारपणे बस चालवत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. त्यावरुन पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्ष होऊ शकत नाही; सुप्रीम कोर्टात खळबळजनक सुनावणी| VIDEO

DIY Floor Cleaning Tool: वाकून फरशी पुसताना कंबर दुखतेय? मग वापरा हा २ मिनिटांत तयार होणारा मॉप, उभ्यानेच होईल सफाई

Panjab Election : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस धक्का, कंबोज यांचा भाजपात प्रवेश

Maharashtra News Live Update: आदानीच्या वीज प्रकल्पाचे काम चालूच

Gold Loan Rules: गोल्ड लोन फेडल्यानंतरही सोने मिळाले नाही? बँकेने उशीर केल्यास द्यावे लागणार दररोज ५ हजार रुपये, वाचा नवे नियम

SCROLL FOR NEXT