Beed News Saam
महाराष्ट्र

Beed News: 'तुझा मुलगा आमच्या ताब्यात, ५ लाख दे नाहीतर..' बीडमध्ये सिनेस्टाईल मुलाचे अपहरण

Student Kidnapping Attempt Foiled by Police in Beed Accused Arrested: बीडमध्ये दिवसाढवळ्या अपहरण. पोलिसांनी अवघ्या दीड तासात केली शाळकरी मुलाची सुटका.

Bhagyashree Kamble

बीड शहरातून एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. दिवसाढवळ्या एका नऊ वर्षाच्या शाळकरी मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. पाच लाख रूपयांच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अवघ्या दीड तासात अपहरणकर्त्याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली आहे. तसेच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणानंतर पोलीस कर्मचाऱ्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी कौतुक केले आहे..

नऊ वर्षांचा मुलगा हा बीड शहरातील पांगरी रोड भागातील रहिवासी आहे. तर, जगदीश गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. त्याने शाळकरी मुलाचे अपहरण करून मुलांच्या वडिलांना फोन केला. 'तुझा मुलगा आमच्या ताब्यात', असे सांगत त्याला ५ लाखांची खंडणीही मागितली. यानंतर कुटुंब घाबरले.

मुलाच्या कुटुंबाने तातडीने पोलीस शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

अवघ्या दीड तासात पोलिसांनी अपहरणकर्त्याला ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली. तसेच मुलाला तातडीने त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली.

यानंतर कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Badam Shake : फक्त ५ मिनिटांत बनवा बदाम शेक, वाचा रेसिपी

Maharashtra Politics : ठाकरेंसोबत आमदार-खासदार फक्त नावाला, लवकरच भाजपात दिसतील, संकटमोचकाच्या वक्तव्यने राजकीय भूकंपाचे संकेत

TMC पक्ष कार्यालयात नेलं अन् विवस्त्र करून व्हिडिओ..भाजप महिला नेत्याचा गंभीर आरोप; परिसरात खळबळ

अबब! एक वर्षाच्या चिमुकल्याच्या चाव्यानं कोब्रा ठार; VIDEO

SCROLL FOR NEXT