शिवसेना आमदाराला मतदान केंद्रात प्रवेश देणं पोलिसांच्या अंगलट; चौघांच निलंबन संदीप नागरे
महाराष्ट्र

शिवसेना आमदाराला मतदान केंद्रात प्रवेश देणं पोलिसांच्या अंगलट; चौघांच निलंबन

विनापरवानगी शिवसेना आमदाराला मतदान केंद्रात प्रवेश करू दिल्याप्रकरणी पोलीस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी केले निलंबित केलं आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : विनापरवानगी शिवसेना आमदार संतोष बांगर (Shivsena MLA) यांना मतदान केंद्रात प्रवेश करू दिल्याप्रकरणी पोलीस दलातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी केले निलंबित केलं आहे. आमदार संतोष बांगर यांच्या अंगरक्षकाच्या ही निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये समावेश आहे. (Police suspended for admitting Shivsena MLA to polling station)

हिंगोलीच्या (Hingoli) औंढा शहरात नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिवसेना आमदार संतोष बांगर (Shivsena MLA Santosh Bangar) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना विनापरवानगी मतदान केंद्रात प्रवेश करू दिल्याप्रकरणी मतदान केंद्राबाहेर बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांना हिंगोलीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी निलंबित केले आहे.

हे देखील पहा -

पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी काढलेल्या आदेशात औंढा, कुरुंदा व वसमत येथील पोलीस स्थानकातील 3 पोलिस कर्मचाऱ्यांसह आमदार संतोष बांगर यांचा अंगरक्षक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. अतुल बोरकर, बंडू राठोड, विजय कुमार जाधव, दिगंबर ठेंगडे अशी या निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणात मतदान झालेल्या दिवशी देखील आमदार संतोष बांगर यांच्या सह त्यांच्या १३ कार्यकर्त्यांच्या विरोधात मतदान केंद्र प्रमुखांच्या तक्रारीवरून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

SCROLL FOR NEXT