एसटी आंदोलकांना नमवण्यासाठी आता पोलीस बळाचा वापर! जयेश गावंडे
महाराष्ट्र

एसटी आंदोलकांना नमवण्यासाठी आता पोलीस बळाचा वापर !

राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आता पोलिसांकडून (Police) दंडुकेशाहीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आगार व्यवस्थापक यांनी दिलेला आहे.

अॅड. जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला : राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आता पोलिसांकडून (Police) दंडुकेशाहीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आगार व्यवस्थापक यांनी दिलेला आहे. या संदर्भामध्ये त्यांनी पोलिसांनाही पत्र दिले आहे. त्यामुळे पोलिसांकडून कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रकार केव्हाही होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यमध्ये गेल्यात तेहतीस दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपाच्या निमित्ताने ते विविध प्रकारचे आंदोलन करीत आहेत. एसटी महामंडळाला राज्य शासनात समाविष्ट करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये झालेल्या बोलणी मधून कुठलाही निर्णय निघालेला नाही. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली आहे. परंतु कर्मचाऱ्यांना ती वेतनवाढ मान्य नाही आहे. एसटी महामंडळ हे राज्य सरकार मध्ये समाविष्ट करावे हीच प्रमुख मागणी घेऊन ही कर्मचारी आंदोलन करीत आहे.

कर्मचारी राज्य सरकारचे ऐकत नसल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. आता राज्य सरकारने मेस्मा कायद्याअंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी राज्यभरातील आगार व्यवस्थापकांनी त्यांच्या हद्दीमध्ये येणाऱ्या पोलीस स्टेशन येथे एक पत्र दिले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान महामंडळाच्या बसेस तोडफोड करण्याची शक्यता आहे. तसेच महामंडळाला बसेस सुरू करायचे आहेत या सुरू करताना कर्मचारी बसेस सुरु करू देणार नसल्यामुळे त्यांचे आंदोलन हे दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी असे पत्र आगार व्यवस्थापक यांनी पोलिसांना दिले आहे. त्यानुसार पोलिस केव्हाही या एसटी कर्मचाऱ्यांवर बळाचा वापर करून त्यांचे हे आंदोलन मोडीत काढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT