कस्टडीत पोलिसांनी लैंगिक छळ केला; आरोपीच्या तक्रारीने अकोल्यात खळबळ SaamTvNews
महाराष्ट्र

कस्टडीत पोलिसांनी लैंगिक छळ केला; आरोपीच्या तक्रारीने अकोल्यात खळबळ

पोलिसांनी कस्टडीत असणाऱ्या दोन आरोपींकडून, पीडित आरोपीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायला लावला..!

जयेश गावंडे

अकोला : चोरीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर अश्लील छळ केल्याचा आरोप केलाय. या प्रकरणामुळे अकोल्यात (Akola) एकच खळबळ उडाली आहे. पीडित आरोपी हा शेगाव मधील सराफा व्यापारी असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे देखील पहा :

अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेत सराफा व्यापारी असलेल्या आरोपीवर अश्लील छळ (Molestation) करून मारहाण झाल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणामुळे अकोल्यातील पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सहायक पोलिस निरीक्षकास तसेच पोलिस (police) कर्मचाऱ्यास मुख्यालयी अटॅच केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन चव्हाण आणि शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी प्रकरणी शेगाव मधील सराफा व्यावसायिकला अटक केली होती.

शेगावातून (Shegaon) अकोल्यात आणतांना गाडीतच आरोपीला प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला. दरम्यान आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. या दोन दिवसांत आरोपी सराफा व्यापाऱ्याला एपीआय चव्हाण आणि काँस्टेबल कांबळे याने उलटे करून मारहाण केल्याचा आरोपही तक्रारकर्ता याने केलाय. दरम्यान, कस्टडी मधील आरोपींना पीडित आरोपी समोर आणण्यात आलंय.

कस्टडीत (Custody) असणाऱ्या दोन आरोपींकडून पोलिसांनी पीडित आरोपीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायला लावल्याचे आरोपी सराफा व्यापाऱ्याचे म्हणणे आहे. यानंतर पायावर जास्त मारहाण झाल्याने पायावर व्रण दिसत होते. गरम पाण्याने व्रण मिटावेत म्हणून व्यापाऱ्याच्या पायावर गरम पाणी म्हणून उकळतं पाणी टाकण्यात आलंय. यामूळे व्यापाऱ्याचा पाय गंभीररित्या भाजला गेलाय. असा आरोपही तक्रारीत करण्यात आलाय.

जिल्हा अधीक्षक यांनी त्या पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी पोलिस मुख्यालयात बदली केली आहे. आरोपीने पोलिस कर्मचाऱ्यांवर कोणत्या हेतूने आरोप केले त्यात काही तथ्य आहे का हे तपासून पाहण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी चौकशी समिती नेमली आहे. त्या चौकशीतून खरे खोटे समोर येईलच. परंतू, हा प्रकार गंभीर असल्याने पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khaman Dhokla: घरच्या घरी बनवा सुरत स्टाईल मऊ , लुसलुशीत खमण ढोकळा

Maharashtra Live News Update: बोपोडी भूखंड अपहार प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचा शितल तेजवानी यांचा दावा

राजकीय समीकरणं बदलली, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? VIDEO

दिल्ली स्फोटाचे महाराष्ट्रात कनेक्शन? पुण्यासह राज्यात ATS ची छापेमारी, ४ डॉक्टरांचा पर्दाफाश होणार

Mumbai News: सेप्टिक टँक साफ करताना मुंबईत मोठी दुर्घटना, एका कामगाराचा मृत्यू; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT