Manoj Jarange Patil  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange News : मनोज जरांगे यांच्या निधनाची खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली; तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा

Manoj Jarange Patil Latest News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी एका युट्युब चॅनलने दिली होती, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Satish Daud

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी एका युट्युब चॅनलने दिली. सोशल मीडियावर ही बातमी अक्षरश: वाऱ्यासारखी पसरली. यामुळे संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, बातमी नजरेस पडताच जरांगे यांच्या समर्थकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी लेखी तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनोज जरांगे यांना काहीही झालं नसून ते सुरक्षित आहेत, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अफवांना अक्षरश: ऊत आला आहे.

समाजकंटकांकडून सोशल मीडियावर वारंवार अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांचं समर्थन करू नये, असं आवाहन पोलिसांकडून केलं जातंय.

तसेच कोणत्याही बातमीची पडताळणी केल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेवू नये, असंही पोलिसांकडून वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, तरी देखील काही समाजकंटक खोट्या बातम्या पसरवत आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी एका युट्युब चॅनलवरुन पसरवण्यात आली आहे.

पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. न्यूज विथ कोमल असं खोटी बातमी देणाऱ्या युट्युबरचं नाव आहे. सध्या सायबर पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT