Nashik: धक्कादायक! नाशिकमध्ये चौकीतच पोलिसांची दारु पार्टी तबरेज शेख
महाराष्ट्र

Nashik: धक्कादायक! नाशिकमध्ये चौकीतच पोलिसांची दारु पार्टी

दारू पिऊन टवाळखोर त्रास देत असल्याने त्यांची तक्रार देण्यासाठी जेष्ठ नागरिक पोलिसांकडे (police) गेले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक: दारू पिऊन टवाळखोर त्रास देत असल्याने त्यांची तक्रार देण्यासाठी जेष्ठ नागरिक पोलिसांकडे (police) गेले होते. मात्र, चौकीत पोलिसच (police) दारू पिताना आढळून आले आहेत. चोराचे उलट्या बोंबा मद्यपी पोलिसांकडून (police) जेष्ठ नागरिकाला धक्का बुक्की आणि मारहाण (Beating) करण्यात आली आहे. गंगापूर रोड परिसरात असलेल्या शांती निकेतन कॉलनीतील (colony) उद्यानमध्ये  टवाळखोर दारू (Alcohol) पिउन धिंगाणा घालत होते. या घटनेची तक्रार देण्यासाठी गेलेल्या जेष्ठ नागरिकांना वेगळेच चित्र बघायला मिळाले आहे. चक्क पोलिस (police) चौकीत पोलिस कर्मचारी दारू पित्त होते. (Police liquor party in Nashik)

हे देखील पहा-

जेष्ठ नागरिकांनी याबाबत विचारले असता, त्याचा राग आल्याने चौकीचे दार आणि लाईट बंदकरून जेष्ठ नागरिक बाळासाहेब शिंदे यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांनी आरडा- ओरड केल्याने परिसरातील नागरिक तिथे जमा झाले आणि नागरिकांची गर्दी बघता पोलिसांनी (police) चौकीतच दारूच्या बाटल्या ग्लास सोडून पळ काढले आहे. या सगळ्या घटनेच स्थानिकांनी व्हिडिओ (Video) चित्रीकरण केले आणि तक्रार दाखल करण्यासाठी गंगापूर पोलिस ठाण्यात गेले. या घटनेनंतर रात्री नागरिक रस्त्यावर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.

तळीराम पोलिसांना वैद्यकीय तपासणीसाठी नाशिकच्या (Nashik) जिल्हा रुग्णालयत पाठवण्यात आले आहे. यामध्ये रघुनाथ ठाकूर, सुरेश जाधव, सागर बोधले, मयूर सिंग असे  या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. एकूणच ज्या पोलिसांवर नागरिकांच्या सुरक्षेची जवाबदारी आहे. त्याच पोलिसांकडून कायद्यांचा उल्लंघन होत असल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे या तळीरामांवर पोलिस आयुक्त काय कारवाई करता याकडे सगळ्यांचे लक्ष लागला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT