Jalna Police: जालन्यात अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक बेपत्ता; जालन्यात एकच खळबळ लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

Jalna Police: जालन्यात अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक बेपत्ता; जालन्यात एकच खळबळ

जालना अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक २ दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: जालना (Jalna) अँटी करप्शन ब्युरोचे (Anti Corruption Bureau) पोलीस (Police) निरीक्षक २ दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहे. 2 जानेवारी रोजी संध्याकाळी ही घटना घडली आहे. संग्राम ताटे असे या पोलीस (Police) निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे जालना शहरात (city) एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संग्राम ताटे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल करण्यात आली आहे. (police inspector suddenly disappears from jalna for two days)

हे देखील पहा-

2 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ताटे हे मित्राला (friend) भेटायला चाललो असे पत्नीला (wife) सांगून यशवंतनगर येथील त्यांच्या घरातून बाहेर पडले होते. यावेळी त्यांनी मोबाईल, गाडी, सोबत नेले नाही. दरम्यान ताटे हे २ दिवसांपासून घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने कदीम जालना पोलीस ठाण्यात बेपत्ता (Missing) झाल्याची केस दाखल करण्यात आली आहे. पोलीसांनी त्यांची शोधाशोध सुरु केली आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे औरंगाबादचे पोलीस अधीक्षक यांनी ही त्यांची दिवसभर जालना शहरात शोधाशोध केली आहे. मात्र, त्यांचा पत्ता लागत नसल्याने एसीबी, पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. संग्राम ताटे यांना बुधवारीच पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती. आणि त्यांची कोकण विभागात पदोन्नतीवर बदली ही झाली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना कुणाची, शिंदे की ठाकरेंची? निकाल लागणार की पुन्हा तारीख पे तारीख? उद्या निकाल लागणार

प्रबोधनकार ठाकरेंचा विचार की हिंदू धर्माचा अपप्रचार; पुस्तकावरुन वादाची ठिणगी

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या विरोधात पुण्यातील तरुण रस्त्यावर; नेमकं प्रकरण काय?

Rakesh Kishore News : परमात्म्याने सांगितलं तेच केलं...; सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानंतर वकील राकेश किशोर काय म्हणाला?

Navi Mumbai Airport: कसं असेल नवी मुंबई विमानतळ? विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' सुविधा

SCROLL FOR NEXT