Yavatmal Crime News
Yavatmal Crime News Saam tv
महाराष्ट्र

अवैध गर्भपात प्रकरण; गर्भलिंग निदान करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरच्या आवळल्या मुसक्या

विनोद जिरे

मुंबई: अवैध गर्भपात आणि गर्भलिंग तपासणी प्रकरणांमध्ये, बीड (Beed) पोलिसांना यश आले आहे. औरंगाबाद मधून गर्भलिंग निदान करणाऱ्या शिकाऊ डॉक्टरच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. सतीश बाळू सोनवणे असं अटक करण्यात आलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे.

बीडच्या बक्करवाडी येथील शीतल गाडे वय ३० या महिलेचा, अवैध गर्भपात करताना ५ जून रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणात बीडच्या पिंपळनेर पोलीस (Police) ठाण्यात मयत शितल गाडे यांच्या पतीसह सासरा, भाऊ आणि तर ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील आरोपी सीमा डोंगरे हिचा पाली येथील तलावात मृतदेह आढळून आला.

तर पकडण्यात आलेल्या सतीश सोनवणे याने शीतल गाडे या महिलेचे गर्भलिंग निदान केल्याची कबुली दिली आहे. हा आरोपी औरंगाबाद येथून नगर या ठिकाणी आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. तर गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनवणे हा १० हजार रुपये घेत असल्याची माहिती पोलीस (Police) अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

दरम्यान, आरोपी सतीश सोनवणे हा यापूर्वी जालना जिल्ह्यातील एका डॉ.गवारे नावाच्या व्यक्तीचा असिस्टंट म्हणून काम करत होता. तसेच मनीषा सानप ही सोनवणे ला फोनद्वारे माहिती देऊन बोलावून घ्यायची आणि सानपच्या घरी गर्भलिंग निदान केले जायचे. त्यामुळे आता या सर्वांनी आतापर्यंत किती जणांचे गर्भलिंगनिदान केले असून, किती जणांचा गर्भपात केला आहे ? यासाठी एजंट मनीशा सानप हिचा बीड (Beed) पोलिसांकडून पीसीआर मागण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमकं कोण कोण आहेत ? हे चौकशी अंती निष्पन्न होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

SCROLL FOR NEXT