Kankavali, MLA Vaibhav Naik, BJP saam tv
महाराष्ट्र

Kankavli News : कनेडी राड्याप्रकरणी भाजप - सेना पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

आज कनेडी गावात गणेश जयंती उत्साहात साजरी केली जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Kankavali News : कणकवली येथील कनेडी गावात मंगळवारी भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात तुफान मारामारी झाली. या मारामारीत शिवसेनेचे (Shivsena) कुंभवडे गावचे सरपंच आप्पा तावडे हे जखमी झाले तर भाजपच्या एक माेठा पदाधिका-यास मारहण झाली. या राड्यानंतर पाेलिसांनी वेळीस हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रण आणली. दाेन्ही गटाच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी (police) सुमारे तीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(Kankavali Latest Marathi News)

मंगळवारी सकाळी नितेश राणे (Nitesh Rane) समर्थक भाजप पदाधिकारी व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांत किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचा राग मनात ठेवून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले. त्यानंतर कनेडी बाजारपेठेत तुफान राडा झाला. यावेळी दाेन्ही गटाची मारामारी देखील झाली. (Maharashtra News)

या मारामारीनंतर कणकवली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने भाजपचे पदाधिकारी व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह चौंघाच्या विरुद्ध तक्रार करण्यात आली.

तसेच भाजपच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्यासह पंचवीस ते तीस जणांच्या विराेधात तक्रार करण्यात आली. पाेलिसांनी दाेन्ही बाजूच्या तक्रारीनूसार सुमारे तीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

यामध्ये भाजपचे (bjp) पदाधिकारी व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्यासह चौंघावर तसेच शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्यासह पंचवीस ते तीस जणांचा समावेश आहे. कणकवली पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हा गुन्हा कलम (353, 332, 143, 147, 148, 149 नुसार) दाखल करण्यात आला आहे. लवकरच संशयितांना ताब्यात घेऊ असेही पाेलिसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT