Sakshi Sunil Jadhav
रेंगाळली, रखडलेली कामे आहेत त्यातून लाभही होईल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
तुमचे कार्यक्षेत्र वाढते राहणार आहे. एकूणच मान ,प्रतिष्ठा यामध्ये भर पडेल. समाजकारण आणि राजकारणामध्ये पुढाकार घेऊन कामे कराल.
दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. उपासना या दृष्टीने दिवस आजचा चांगला आहे .
कोणाचेही सहकार्याची आज गरज नाही. असा दक्षतेचा इशारा आज आपल्या राशीला आहे. काळजी घ्यावी.
वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभणार आहे. जे कराल त्यामध्ये यश मिळण्याचा आजचा दिवस आहे.
उगाचच उठाठेवी आज नकोत. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये प्रगती होईल.
संततीचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. काही जणांचे वैचारिक परिवर्तन होईल. देवी उपासना आज आपल्याला फलदायी ठरेल. गुंतवणुकीसाठी दिवस छान.
प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील. राहत्या जागेचे प्रश्नही मार्गी लागतील. सुखाच्या नव्या पाऊलवाटा तयार होतील.
काही काम धाडसाने आज पार पाडाल. द्विधा मनस्थिती मात्र टाळावी. नोकरीमध्ये समाधानकारक गती राहील.
व्यवसाय मध्ये वाढ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधण्याचा आजचा दिवस आहे. दिवस व्यस्त राहील.
काही आरोग्याच्या जुन्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ आणि समाधान यांनी भारलेला आजचा दिवस आहे.
कामाचा ताण आणि दगदग काही जणांना जाणवेल. खर्चाचे प्रमाण सुद्धा वाढते राहील." अंथरूण बघून पाय पसरावे" असा काहीसा आजचा दिवस आहे.