satish bhosale  Saam Tv
महाराष्ट्र

Satish Bhosale: खोक्या मस्त, खाकी त्रस्त, खोक्याने पोलिसांची इभ्रत टांगली वेशीला,खाकीच घाबरते खोक्याला?

Police Failure: दररोज खोक्या भोसलेच्या नवनवे कारनामे समोर येत आहेत.. मात्र अजूनही खोक्या फरारच आहे...त्यामुळे खोक्याने पोलिसांची इभ्रत वेशीला टांगलीय.. त्यामुळे खोक्याला नेमकं कोण वाचवतंय? खोक्या पोलिसांना का सापडत नाही? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Snehil Shivaji

ना आंधळे ना खोक्या...गँग्स् ऑफ बीडमुळे कायदा सुव्यवस्थेचे अक्षरश धिंडवडे निघालेत. आधी वाल्मिक कराड आणि गँग्स् नं केलेली सरपंचांची निर्घृण हत्या आणि आता सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या. जो लोकांना बॅटनं मारतो, पैशांचा माज करत रस्त्यावर पैसे उधळतो, मुलांना खुलेआम धमकावतो.. मर्जी होईल तितक्या मुक्या प्राण्यांची शिकार करतो. या खोक्याचे कायदा सुव्यवस्थेला पायदळी तुडवणारे अनेक व्हिडीओ समोर आल्यानं पोलिसचं खोक्याला घाबरतात का असा सवाल आहे.

मात्र आता तर खोक्यानं पोलिसांची लाजच काढलीय कारण दोन-दोन गंभीर गुन्हे दाखल असून खोक्या राजरोसपणे मुलाखती देत सुटला आहे. मात्र पोलीसांना तो साप़डत नाहीये. त्यामुळे लोकलज्जेखातर तरी या खोक्याचा बंदोबस्त पोलिसांनी करावा एवढीच माफक अपेक्षा.

याच पोलिसांनी खोक्याला तर मोकाट सोडलंच आहे मात्र लाजेखातर त्याची वापरात नसलेली गाडी जप्त करुन कारवाईचा बनाव केलाय...हे म्हणजे पोलीसांच्या अकार्यक्षमतेच लाजिरवाण उदाहरणच म्हणावं लागेल. कारण

कधी स्कॉडलंड यार्डशी तुलना होणारी खाकी आज कधी भ्रष्ट मंत्री तर कधी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या दावणीला बांधली गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे सामान्याना न्याय देणारं आणि सदरक्षणाय असलेलं पोलिस खातं नेमक्या कोणत्या खलांचा नाश करंतय की याच खलांच्या रक्षणासाठी कार्यतप्तर आहे हेच कळत नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT