Manasvi Choudhary
राज्यात शालेय विद्यार्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला. शाळांच्या ५० मीटरच्या परिसरात प्रक्रिया केलेले, डबाबंद खाद्यपदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, साखर व मीठ असणाऱ्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणली आहे.
शाळकरी विद्यार्थाच्या आरोग्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी फळे, भाज्या, कडधान्ये, दूध व पौष्टिक पदार्थ उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे.
चॉकलेट्स, मिठाई, पेढे, कोल्ड्रिंक डबाबंद खाद्यपदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, साखर व मीठ असणाऱ्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणली आहे.
वडापाव, समोसे, भजी, फ्रेंच फ्राईज या तेलकट पदार्थ्यांच्या विक्रीला बंदी आणली आहे.
चिप्स, नमकीन, बिस्किट, न्यूडल्स, आईस्क्रिम पॅकेज्ड फूड्सना शाळेच्या परिसरात विक्रीसाठी बंदी करण्यात आली आहे.
बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज आणि मैद्यापासून तयार केलेले सर्वप्रकारचे फास्ट फूड, ज्यामध्ये पौष्टिकतेचा अभाव असतो.