dinkar shirsat , wardha , heart attack saam tv
महाराष्ट्र

ह्रदयविकाराच्या झटक्यानं पोलीस अंमलदाराचा मृत्यू; गस्त घालताना झाले हाेते अस्वस्थ

पोलीसांनी सलामी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या मुळ गावी तेलघाना (जि. बीड) येथे नेण्यात आला.

साम न्यूज नेटवर्क

- चेतन व्यास

Wardha News : रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार रामहरी दिनकर शिरसाठ (वय ३३) यांना कर्तव्यावर असतानाच ह्रदयविकाराचा तीव्र झटका (heart attack) आल्याने त्यांचा पहाटेच्या सुमारास निधन झालं. या घटनेची माहिती समजातच पोलीस विभागात शोकाकुल वातावरण पसरले होते.

पोलीस अंमलदार रामहरी दिनकर शिरसाठ यांची २०१० मध्ये पाेलीस दलात नियुक्ती झाली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध पोलीस ठाण्यांत कर्तव्य बजावले. सध्या ते रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

रामहरी हे डायल ११२ या अत्याधुनिक वाहनातून गस्त घालत असतानाच त्यांना मध्यरात्री अचानक अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे ते आराम करण्यासाठी काही वेळासाठी घरी गेले. घरी आराम करीत असताना अचानक त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा पहाटे ५ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, १५ महिन्यांचा मुलगा आणि ६ वर्षांची मुलगी आहे. ते वर्ध्यातील घरी राहत होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता माहिती होताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती.

रामहरी शिरसाठ यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरिय तपासणीसाठी पोलीस वाहनात आणण्यात आला. उत्तरिय तपासणी झाल्यावर त्यांचा मृतदेह पोलीस मुख्यालयात नेण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला पोलीस सलामी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या मुळ गावी तेलघाना जि. बीड येथे नेण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT