Crime News Saam tv
महाराष्ट्र

ॲमेझॉनच्या १११ ग्राहकांना फसविले; भाग्यश्री पावलेवर गुन्हा

विजय पाटील

सांगली Crime News : ॲमेझॉन amazon कंपनीची २८ लाखाची फसवणुक केल्याप्रकरणी संशयीत भाग्यश्री पावले या महिलेविरुद्ध संजयनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एनटेक्स ट्रान्सपोर्ट कंपनीतील केतन वाघ यांनी भाग्यश्री पावले विरुद्ध फिर्याद दिली हाेती. त्यानूसार चाैकशीअंती पावलेवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी दिली.

ऑनलाईन खरेदीच्या online shopping वस्तूचे पैसे हे ग्राहकास वस्तु दिल्यानंतर त्याच्याकडून घरी घेतले जातात. एखाद्या ग्राहकाकडे सुटे पैसे नसल्यास कंपनीच्या खात्यावरुन ऑनलाईन पध्दतीने सुटे पैसे ग्राहकाच्या खात्यावर वर्ग करण्याची सुविधा ॲमेझॉन कंपनीकडे आहे. परंतु अनेकांना ते माहित नसते. त्याचा लाभ उठविण्यासाठी संशयीत पावले जास्तीची रक्कम ग्राहकास त्यांच्या खात्यावर वर्ग करुन ती पुन्हा त्याच ग्राहकाकडून रोखीने घेत असे.

दरम्यान सुमारे १११ ग्राहकांकडून गरजेपेक्षा जास्त रक्कम वर्ग करुन कंपनीची २८ लाख १० हजार तीनशे रुपयांची फसवणुक केल्याची तक्रार केतन वाघ यांनी दिली. त्यानूसार संजयनगर पाेलिसांनी भाग्यश्री पावलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT