Sangli Crime News saam tv
महाराष्ट्र

Sangli News : अतिक्रमण विराेधी पथकासमाेर महिलेने असं काही केलं सर्वांचाच उडाला थरकाप

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली हाेती.

विजय पाटील

Sangli Crime News : सांगली (sangli) जिल्ह्यातील मिरज (miraj) तालुक्यातील खोतनगर येथील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पथकासमोरच वृद्ध महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेनंतर पाेलिसांनी (police) संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

सांगलीच्या मिरज-मालगांव रोड वरील खोतनगर येथील सुमन मनोहर वाघमारे, सुरेश मनोहर वाघमारे यांनी महापालिकेच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून पुर्ण रस्ताच बंद केला असल्याबाबत मिरज सुधार समिती गेल्या दिड वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे.

याबाबत सुधार समितीने ३१ मेपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील यांनी सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार काल अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी अतिक्रमण हटविण्यास गेले असता सुमन वाघमारे या महिलेने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच महापालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सावधानता बाळगत आग विझवली. याबाबत महापालिकेने त्यांच्या विरोधात कारवाई करताना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसांत तक्रार दिली.

या तक्रारीनूसार वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहायक आयुक्त अशोक कुंभार यांनी दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - महादेव मुंडे प्रकरणी SIT चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Pimpri Chinchwad Crime : ज्येष्ठ नागरिकाला बांधून बंगल्यात दरोडा; राजस्थानी दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार, प्रायव्हेट फोटो काढून ब्लॅकमेलिंग, काळंनिळं होईपर्यंत मारलं; बीड हादरलं

श्रावणात वांगी का खाऊ नये? जाणून घ्या

Saiyaara: 'सैयारा' चित्रपटासाठी 'ही' बॉलिवूडची फेमस जोडी होती पहिली पसंती

SCROLL FOR NEXT