police charged maratha samaj members in latur saam tv
महाराष्ट्र

Maratha Andolan : पाेलिस काेणाच्या दबावाखाली आहेत ? गुन्हा दाखल झाल्यानंतर लातूरमध्ये मराठा आंदाेलक भडकले

Rasta Roko Andolan : लातूर शहरासह जिल्हाभरात ठीक ठिकाणी दोन दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांनी महामार्ग अडवला होता.

Siddharth Latkar

- संदीप भाेसले

Latur News :

लातूर जिल्हा पाेलिस प्रशासनाने काेणाच्या तरी दबावाखाली येत मराठा समाजाचे आंदाेलन माेडीत काढण्यासाठी जाणिवपूर्क मराठा समाजातील युवकांवर गुन्हा दाखल करत आहे अशी खंत लातूर येथील मराठा आंदाेलकांनी साम टीव्हीशी बाेलताना केली. कितीही दडपण आणले तरी मराठा समाज मागे हटणार नाही असे मत आंदाेलकांनी साम टीव्हीशी बाेलताना नमद केले. (Maharashtra News)

राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी शनिवारपासून मराठा समाजाला रास्ता राेकाे आंदाेलन करण्याचे आवाहन केले हाेते. त्यानूसार राज्यभरातील गावागावात मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केला.

लातूर शहरासह जिल्हाभरात ठीक ठिकाणी दोन दिवसांपूर्वी मराठा आंदोलकांनी महामार्ग अडवला होता. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे महामार्ग अडवला असे सांगत आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पाेलिसांनी (कलम 143,188, 341 335) अशा कलमान्वये गुन्हे दाखल केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान गुन्हे दाखल झाल्याने आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासन कुठल्या दबावाखाली आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे असा प्रश्न आंदाेलकांच्यावतीने विकास कदम यांनी उपस्थित केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT