devai mahila nagari sahkari patsanstha  saam tv
महाराष्ट्र

Crime News : 'देवाई' त ३१ कोटींचा घोटाळा, सहकार क्षेत्रात खळबळ; अध्यक्षासह संचालकांवर सातारा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या घोटाळ्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील ठेवीदारांमध्ये पैसे बुडाल्याच्या भीती निर्माण झाली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर मधील आदर्श पतसंस्थेने २०२ कोटीची गुंतवणूकदारांची फसवणूक केल्यानंतर आणखी एका पतसंस्थेत ३१ कोटींचा घोटाळा झाला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

देवाई महिला पतसंस्था असे त्या पतसंस्थेचे नाव आहे. ३१ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी देवाई पतसंस्थेच्या संचालक मंडळावर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक असलेल्या पती, पत्नीने स्वतःच्या संस्थांना बेकायदा १३ कोटी ८३ लाख ८९ हजार १०१ रुपयांचे कर्ज देऊन आयसीआयसीआय बँकेत आठ कोटींची 'एफडी' केल्याचे ताळेबंदात दाखवून ३१ कोटी ९१ लाख १४ हजार ७५२ रुपये परस्पर हडप केल्याचे समोर आले आहे.

देवाई महिला नागरी पतसंस्थेच्या (devai mahila nagari sahkari patsanstha) अध्यक्ष मीना महादेव काकडे, कार्यकारी संचालक महादेव अच्युत काकडे, सात कर्जदार संस्था, सर्व शाखा व्यवस्थापक, कर्ज वितरण अधिकारी, कर्मचारी यांचा संशयितांमध्ये समावेश आहे. लेखा परीक्षक दत्तात्रय प्रभाकर धुमाळ यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT