mahendra maharaj maske saam tv
महाराष्ट्र

Hingoli: महेंद्र महाराज म्हस्केंवर हल्ला; संभाजी ब्रिगेडच्या २५ जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणी कठोर कार्यवाही करावी अन्यथा राज्यभरात आंदोलन करु असा इशारा वारकरी सांप्रदायाने दिला हाेता.

संदीप नांगरे

हिंगाेली : हिंगोलीत (hingoli) हटकर धनगर समाजाचे राज्यस्तरीय नेते व प्रख्यात प्रवचनकार महेंद्र महाराज म्हस्के (mahendra maharaj maske) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अखेर संभाजी ब्रिगेडच्या (sambhaji brigade) २५ कार्यकर्त्यांवर कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्या बद्दल कीर्तनाच्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी महेंद्र महाराज म्हस्के यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाला हाेता. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात हटकर धनगर समाजासह ओबीसी समाज आक्रमक झाला होता. (sambhaji brigade latest marathi news)

शासकीय विश्रामगृहात शेकडो कार्यकर्ते जमले हाेते. मस्के महाराजांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आक्रमक झाले होते. राज्यभरात वारकरी सांप्रदायाने देखील याबाबत कठोर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता कळमनुरी पोलिसांनी महेंद्र महाराज म्हस्के यांची तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान पोलिसांची वेगवेगळी पथके देखील संशयितांच्या अटकेसाठी रवाना करण्यात आल्याची माहिती कळमनुरी पोलिसांनी दिली. कुणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेतील संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पाेलीसांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT