Prashant Koratkar Arrested 
महाराष्ट्र

Prashant Koratkar : तेलंगणातून बेड्या, प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलं, शिवरायांवरील वादग्रस्त प्रकरणी अटक

Prashant Koratkar Arrested News : प्रशांत कोरटकरला पोलिसांनी कोल्हापूरला आणलं आहे. कोल्हापूरमध्ये मोठ्या बंदोबस्तात कोरटकर याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. कोरटकर याला कुणी कुणी मदत केली? याचाही शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Prashant Koratkar Arrested : महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकर याला अखेर कोल्हापुरात (Nagpur-based journalist Prashant Koratkar) आणलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे कोरटकर याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. प्रशांत कोरटकर याला मोठ्या बंदोबस्तात राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे. प्रशांत कोरटकर याचा मोबाईल पोलिसांनी जप्त करण्यात आला आहे.

जुना राजवाडा पोलिस स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. प्रशांत कोरटकर याची वैदकीय चाचणी केल्यानंतर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. प्रशांत कोरटकर याला तेलंगणा येथून अटक केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यामुळे कोरटकर याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. थोड्याच वेळात प्रशांत कोरटकर याची वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्यानंतर दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त तैणात करण्यात आले आहे.

कोल्हापूरकरांचा संताप -

प्रशांत कोरटकर यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनाही धमकी दिली होती. त्यानंतर शिवभक्तांच्या भावना दुखावल्या होत्या. कोरटकर याला कोल्हापूरमध्ये आणल्यानंतर शिवभक्तांकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. कोरटकर याचे पायताणाने स्वागत करायला हवे, अशा प्रतिक्रिया आणि सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

मावळ्यांनो पायतान घेऊन स्वागताला या!

प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केल्यानंतर सोशल मीडियातून पोस्ट व्हायरल झाली आहे. कोल्हापुरातल्या मावळ्यांनो पायतान घेऊन कोरटकरच्या स्वागताला या! अशी पोस्ट कोल्हापूरमध्ये व्हायरल होत आहे. कोरटकरला न्यायालयात हजर करण्यापूर्वी पायतान घेऊन स्वागताला या अशी पोस्ट व्हायरल झाली आहे. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याने कोल्हापूरकरांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशांत कोरटकर प्रकरणात आत्तापर्यंत काय काय झालं?

- २५ फेब्रुवारी रात्री १२ वाजून ३ मिनिटांनी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्याजवळ महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान आणि जीवे मारण्याची धमकी

- २५ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

- भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६,१९७,२९९,३०२,१५१, ३५२ अन्वये गुन्हा दाखल

- कोरटकर याचे सोशल मिडिया तपासले गेले तेव्हा अनेक दिग्गज व्यक्तींसोबत त्याचे फोटो मिळून आले

- २६ फेब्रुवारीला कोरटकर ने त्याच्या नागपूर मधील निवासस्थानातून पळ काढला

- २७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला किती आदर आहे याचा व्हिडिओ झाला व्हायरल

- २८ फेब्रुवारी रोजी त्याचा अंतरिम जामीन मंजूर झाला

- ३ मार्च रोजी कोरटकर याचे आलिशान कारसोबत चे फोटो आणि व्हिडिओ आले समोर

- ११ मार्च रोजी पुन्हा सुनावणी, यावेळी सुद्धा त्याला १७ मार्च पर्यंत दिलासा

- १८ मार्चला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केला

- २२ मार्च रोजी कोल्हापूर पोलिसांनी कोरटकर विरोधात लुक आऊट नोटीस नोटीस केली जारी

- २३ मार्च ला कोरटकर याला तेलंगणा मधून पोलिसांनी घेतले ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT