Sangli, Youth, Arrest , Police  Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : कॉलेज कॉर्नर जवळ झाला हाेता वाद, युवकास संपवलं; तिघे अटकेत

दीड महिन्यापूर्वी शहरातील कॉलेज कॉर्नर जवळ झाला हाेता वाद.

विजय पाटील

Sangli News : सांगली येथील कर्नाळ रस्ता परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ राहणाऱ्या महाविद्यालयीन युवकाचा (youth) धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाला हाेता. अजित बाबुराव अंगडगिरी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पाेलीसांनी तिघांना अटक (arrest) केली आहे. (Maharashtra News)

अजित याचा धारदार शस्त्राने दिवसाढवळ्या खून करण्यात आला होता. अजितला शेतातून जबरदस्तीने रस्त्यावर आणून हा खून करण्यात आला होता. या प्रकारामुळे शहर हादरून गेले होते. या खूनाचा तपास करण्यासाठी पाेलीसांची पथक रवाना झाली हाेती.

याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. हे तिन्ही संशयित आरोपी अल्पवयीन आहेत. दीड महिन्यापूर्वी शहरातील कॉलेज कॉर्नर जवळ झालेल्या वादाच्या रागातून अजित याचा खून केल्याचे तिन्ही संशयतांनी सांगितल्याचा माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT