MLA Vaibhav Naik, Kankavli Police, Shivsena, BJP  saam tv
महाराष्ट्र

Kankavli News : पहाटेच्या सुमारास शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांना अटक; वैभव नाईकांचा शाेध सुरु

पंधरा दिवसांपुर्वी झाला हाेता राडा.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Kankavli News : कणकवलीतील (kankavali) कनेडी गावात झालेल्या राड्या प्रकरणी पाेलिसांनी (police) शिवसेना (shivsena) आणि भाजप (BJP) या दाेन्ही गटातील दहा जणांना अटक (arrest) केली आहे. या सर्व संशयितांना आज न्यायालयात (court) हजर केले जाणार आहे. (Kankavli Latest Marathi News)

भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट शिवसेना पदाधिकाऱ्यांत पंधरा दिवसांपुर्वी राडा झाला हाेता. यामध्ये शिवसेनेचे कुंभवडे गावचे सरपंच आप्पा तावडे हे जखमी झाले. सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचे समजताच आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) हे देखील गावात पाेहचले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना थाेपविण्यासाठी प्रयत्न केला हाेता.

या राड्यानंतर पाेलिसांनी वेळीस हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रण आणली हाेती. दाेन्ही गटाच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी (police) सुमारे तीस जणांवर गुन्हा दाखल केला हाेता. पाेलिसांनी घटनेतील संशयितांची धरपकड करण्यास प्रारंभ केला आहे. (Breaking Marathi News)

पाेलिसांनी पहाटे कनेडी राडा प्रकरणात शिवसेना- भाजपच्या दहा कार्यकर्त्यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी पहाटे दाेन वाजता केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाेलिस संशयितांना शाेधत आहेत. या राड्यात आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या प्रकरणात वैभव नाईकांवर अटकेची टांगती तलवार राहणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT