Latur, Police, Osmanabad, Girl Child saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News : नैराश्यातून आईने घोटला बाळाचा गळा

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

दीपक क्षीरसागर

दुसरी मुलगी झाल्याने जन्मदात्या आईनेच तीन दिवसाच्या बाळाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील गातेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी महिलेस अटक केली आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार उस्मानाबाद (osmanabad) जिल्ह्यातील होळी येथील रेखा किसन चव्हाण हि महिला प्रसुतीसाठी काटगाव तांडा येथे माहेरी आली होती. जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (27 डिसेंबर) चव्हाण प्रसुतीसाठी दाखल झाली होती. तिला मुलगी झाली. रेखा हिला यापुर्वी देखील एक मुलगीच झाली हाेती. (Maharashtra News)

दरम्यान दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने रेखा हिने रूमालाच्या सहाय्याने तीन दिवसाच्या बाळाचा खून केला. ही बाब पाेलिस (police) तपासात उघड झाली. पाेलिसांनी गातेगाव पोलिस ठाण्यात रेखा चव्हाण हिच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला.

रेखा चव्हाण हिला या प्रकरणी अटक केली असून आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती नंदकिशोर कांबळे (पाेलीस उपनिरीक्षक, गातेगाव पाेलिस ठाणे) यांनी दिली. (Latur Latest Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election Result : मुंबईत भाजपानं रचला इतिहास, मुख्यमंत्री फडणवीसांनी कुणाला दिलं विजयाचं श्रेय, वाचा

PCMC Candidate : भाजपच्या दादाने आखाडा जिंकला, काका-पुतण्याचा पराभव, वाचा आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

Maharashtra Elections Result Live Update: कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक४ मध्ये दोन गटात तुफान हाणामरी

मुंबईत येऊन ठाकरे बंधूंना भेटणार; भाजप BMC मध्ये वरचढ ठरताच खासदार निशिकांत दुबे यांचं आव्हान

मुंबईकरांची घराणेशाहीला चपराक; आमदार, खासदारांच्या मुलांचा दारुण पराभव|VIDEO

SCROLL FOR NEXT